सव्वातासात उतरेल आत्महत्येचे भूत
By Admin | Updated: May 30, 2014 01:17 IST2014-05-30T01:17:19+5:302014-05-30T01:17:19+5:30
आयुष्यात काही क्षण फार बेसावधपणे येतात. मनाचा विवेक संपतो आणि एखादे दु:ख वरचढ होते. आता आयुष्यात काहीच उरले नाही म्हणून प्रचंड निराशा येते. विषण्णता..एकटेपणा जगण्यातला रस संपवून टाकतो आणि

सव्वातासात उतरेल आत्महत्येचे भूत
प्रकाश गोविंदवारचा दावा : आत्महत्या थांबविण्यासाठी तयार केली वेबसाईट
मंगेश व्यवहारे - नागपूर
आयुष्यात काही क्षण फार बेसावधपणे येतात. मनाचा विवेक संपतो आणि एखादे दु:ख वरचढ होते. आता आयुष्यात काहीच उरले नाही म्हणून प्रचंड निराशा येते. विषण्णता..एकटेपणा जगण्यातला रस संपवून टाकतो आणि मनात आत्महत्येचा विचार येतो. पण हाच क्षण महत्वाचा असतो. आत्महत्येचा विचार येतो त्या क्षणाला सहानुभूती आणि मदतीचा हात देऊन संबंधिताला आत्महत्येपासून परावृत्त करता येते. सव्वा तासात आत्महत्या करण्याचा विचार संपेल आणि जीवन सुंदर असल्याचा विश्वास पटेल. यासाठी प्रकाश गोविंदवार मार्गदर्शक म्हणून समोर आले आहेत. एखाद्या घटनेमुळे माणूस जेव्हा निराशेत जातो, तेव्हा त्याच्या भावनांचा उद्रेक होतो.
गरज असते कुणाच्यातरी सहानुभूतीची
विवेकावर नियंत्रण मिळविणे शक्य होत नाही. अशा स्थितीत मनावरचा ताबा सुटतो आणि तो आत्महत्येसारखा आत्मघातकी निर्णय घेतो.
मात्र हे क्षणिक असते. हा क्षण टाळण्यासाठी त्याला गरज असते, सहानुभूतीची, त्याच्या भावना समजवून घेणार्या व्यक्तीची व मार्गदर्शकाची. गोविंदवार यांनी आत्महत्या टाळण्यासाठी वेबसाईट तयार केली असून, वेबसाईटवर दिलेल्या माहितीचे चिंतन केल्यास, सव्वातासात आत्महत्येचे भूत उतरेल, असा दावा त्यांनी केला आहे.
६६६.२४्र्रूीि२ं५ी१.ूे असे या वेबसाईचे नाव असून, ही वेबसाईट खास विद्यार्थ्यांंंंसाठी तयार केली आहे. प्रकाशसुद्धा विद्यार्थीदशेत अशाच अवस्थेतून बाहेर पडले. १९८४ साली प्रकाश दहावीत ६४ वा मेरिट आले होते. मुलगा इंजिनिअर व्हावा, अशी अपेक्षा आईवडिलांची होती. मात्र बारावीच्या परीक्षेत तयारी कमी पडल्याने, परीक्षेतून ‘ड्रॉप’ घेतला. त्यानंतर ते स्वत:लाच दोष देऊ लागले. आपले एक वर्ष वाया गेले. आपण आयुष्यात काहीच करू शकणार नाही. आता सर्व संपले. यामुळे ते चिंताग्रस्त झाला. आयुष्य संपविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि अंतिम समयी त्याला एक मार्गदर्शक भेटला. त्यांना निराशेतून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन केले. यानंतर विपश्यनेचा दहा दिवसाचा क्लास केला. आणि निराशेतून तो नेहमीसाठी परावृत्त झाला. पुढे त्याने पॉलिटेक्निक करून, आयुष्याचा मार्ग सुकर केला. परंतु याच दरम्यान त्यांच्या एका मित्राने कामात अपयश आल्याने आत्महत्या केली. मित्राच्या आत्महत्येचा परिणाम त्यांच्या मनावर झाला. आत्महत्या थांबविण्यासाठी काय करता येईल, याच्या विचारात ते होते. यादरम्यान त्यांनी ‘आत्महत्या एक भूत की आत्मकथा’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकातून आत्महत्येचे सखोल चिंतन मांडले. १0 हजार लोकांना हे पुस्तक त्यांनी नि:शुल्क वाटले. यातून त्यांना वेबसाईट तयार करण्याची प्रेरणा मिळाली. २00८ साली मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत वेबसाईट तयार केली आहे. तीन भागात ही वेबसाईट आहे. पहिल्या भागात १0 मिनिटांचे मार्गदर्शन केले आहे. दुसर्या भागात २0 मिनिटांचे मार्गदर्शन तर तिसर्या ४५ मिनिटांच्या भागात जगण्याचे महत्त्व, मृत्यूनंतरच्या पीडा, यावर विवेचन केले आहे. जो कोणी अंतर्मुख होऊन या वेबसाईटवर दिलेली माहिती वाचेल, तो कधीच आत्महत्या करणार नाही, असा प्रकाश यांचा दावा आहे. (प्रतिनिधी)
पैसा महत्त्वाचा नाही
प्रकाश यांनी ‘जिंदगी ना मिलेंगी दोबारा’ नावाचे एक लाख बुकलेट छापून वाटले आहे. यातही जगण्याचे र्मम आहे. पूर्वी ते निकालाच्या दिवसांमध्ये पॉम्पलेट छापून विद्यार्थ्यांंंंमध्ये जनजागृती करीत होते. आता ते निराश व्यक्तींना नि:शुल्क मार्गदर्शन करतात. आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे ते मानतात. या कामात त्यांना पैसा महत्वाचा वाटत नाही कारण पैशांपुढे माणसाचा जीव आणि त्याचे जीवन करोडो मोलाचे आहे.
विद्यार्थ्यांंंंनो
निराश होऊ नका
आई-वडिलांना तुमच्याकडून भरपूर अपेक्षा असतात, मात्र काही कारणास्तव तुम्ही अभ्यासात कमी पडत असाल. तरी निराश होऊ नका, आईवडिलांना विश्वासात घ्या, करिअरच्या दुसर्या संधी शोधा. डॉक्टर, इंजिनिअर होऊ न शकण्याची खंत बाळगू नका, कुठलेही क्षेत्र निवडताना प्रामाणिक प्रयत्न करा. जीवनाला पॉझिटीव्ह घ्या, ‘फिर सक्सेस झक मारके तुम्हारे पिछे दौडेंगी’ असा सल्ला प्रकाश यांनी विद्यार्थ्यांंंंना दिला आहे.