घाटकोपर-ठाणे धावणार मेट्रो

By Admin | Updated: June 15, 2014 02:05 IST2014-06-15T02:05:04+5:302014-06-15T02:05:04+5:30

एक महिन्यात अहवाल : २२ हजार कोटी रुपयांचा खर्च,ठाण्याची मेट्रो मुंबईशी जोडून ठाणे ते घाटकोपर असा ३१ किलोमीटरचा मार्ग उभारला जाईल

Ghatkopar-Thane Runway Metro | घाटकोपर-ठाणे धावणार मेट्रो

घाटकोपर-ठाणे धावणार मेट्रो

मुंबई - ठाणे शहरात मोनो रेल्वे आणि मेट्रो रेल्वे उभारण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रकल्प अहवाल व्यवहार्य नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ठाण्याची मेट्रो मुंबईशी जोडून ठाणे ते घाटकोपर असा ३१ किलोमीटरचा मार्ग उभारला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिली.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी ठाणे मेट्रोबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राइट्स या केंद्र सरकारच्या कंपनीला आता प्रकल्प अहवालाचे काम देण्यात आले आहे. कंपनीने घाईघाईने अहवाल द्यावा, असा दबाव मी त्यांच्यावर अजिबात आणणार नाही. हा २२ हजार कोटींचा प्रकल्प आहे. लोकांच्या सुरक्षिततेशीही निगडित आहे. त्यात घाई करणे योग्य होणार नाही. अहवाल येताच पुढील कार्यवाही करू. आम्ही मुंबईप्रमाणे ठाणे आणि परिसरासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्प करणारच, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. शिंदे, सरनाईक, योगेश सागर, सुभाष देसाई, रवींद्र वायकर यांनी ठाण्याबाबत विलंब होत असल्याची तक्रार केली. दरम्यान, रिलायन्सच्या मनमानीचा अनुभव शासनाला येत आहे. त्यामुळे यापुढे प्रकल्पांची मालकी खासगी कंपनीला देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Ghatkopar-Thane Runway Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.