शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तुमची कामे लवकर करून घ्या, 'आपले सरकार' पोर्टल पाच दिवस राहणार बंद, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:52 IST

Aaple Sarkar Portal News: सर्वसामान्यांना लागणाऱ्या शासकीय कागदपत्रांसाठी सरकारकडून आपले सरकार हे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. या माध्यमांतून ऑनलाईन अर्ज सादर करता येतात.

Aaple Sarkar Update: आपले सरकार पोर्टलवरून काही शासकीय कागदपत्रांसंदर्भात तुमचे काम असेल, तर आजच करून घ्या. कारण पुढील पाच दिवस हे पोर्टल बंद राहणार आहे. महाराष्ट्र माहिती तंज्ञज्ञान महामंडळाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. १० ते १४ एप्रिल या काळात हे पोर्टल सर्वच सेवांसाठी बंद असणार आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

वेगवेगळ्या शासकीय सेवा आणि कागदपत्रांसाठी अर्ज करण्याची सुविधा असलेले आपले सरकार पोर्टल पाच दिवस बंद राहणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांच्या सेवा सर्वसामान्य नागरिकांना या पोर्टलवरून उपलब्ध करून दिल्या जातात. तांत्रिक कारणास्तव पाच दिवस पोर्टल ठेवले जाणार आहे. 

आपले सरकार पोर्टल पाच दिवस बंद का ठेवले जाणार?

आपले सरकार पोर्टलबद्दल प्रशासनाने सांगितले की, 'सर्व्हरवरील डेटा स्थलांतर करण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे १० ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत पोर्टल बंद राहील. या दरम्यान पोर्टलवरील कोणतीही सुविधा उपलब्ध राहणार नाही. ही प्रक्रिया प्रणालीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक आहे.'

आपले सरकार हे पोर्टल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार विकसित करण्यात आलेले आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत या उद्देशाने हे सुरू केलेले आहे. 

नागरिक आपले सरकार पोर्टलवरून सर्वच कामासाठी लागणारी शासकीय प्रमाणपत्रे (जसे की उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे) मिळवण्यासाठी या पोर्टलवरून अर्ज करू शकतात. त्याचबरोबर शासकीय सेवांची माहितीही मिळवू शकतात. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारITमाहिती तंत्रज्ञान