परिवर्तनाच्या लढार्ईस सज्ज व्हा

By Admin | Updated: March 21, 2016 03:22 IST2016-03-21T03:22:20+5:302016-03-21T03:22:20+5:30

केंद्रातील मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालत आहे. त्यांना राज्यघटनेशी काही देणेघेणे नाही. मनुस्मृतीला मानणारे कोण आहेत. याची जाणीव सर्वांनाच आहे

Get ready for the transformation fight | परिवर्तनाच्या लढार्ईस सज्ज व्हा

परिवर्तनाच्या लढार्ईस सज्ज व्हा

नागपूर : केंद्रातील मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालत आहे. त्यांना राज्यघटनेशी काही देणेघेणे नाही. मनुस्मृतीला मानणारे कोण आहेत. याची जाणीव सर्वांनाच आहे. अशा शक्तीविरोधात लढण्याचे आव्हान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईसाठी कार्यक र्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव व काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनी रविवारी येथे केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचा समारोप ११ एप्रिलला येथील कस्तूरचंद पार्क येथे जाहीर सभेच्या माध्यमातून होणार आहे. कार्यक्रमाच्या तयारीसाठी राणी कोठी येथे आयोजित विदर्भातील कार्यकर्त्याच्या बैठकीत मोहन प्रकाश यांनी मार्गदर्शन केले.
प्र्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय महासचिव मुकु ल वासनिक , माजी खा. विलास मुत्तेमवार, विधान परिषदेतील गटनेते आ. शरद रणपिसे, विधानसभेतील पक्षाचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊ त, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक आदी उपस्थित होते.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसने विधान भवनावर काढलेल्या मोर्चाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ११ एप्रिलचाही कार्यक्रम असाच भव्य होणार आहे. त्यात देशभरातील काँग्रेसचे नेते सहभागी होतील, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी
दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Get ready for the transformation fight