जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी राज्य शासनाची सुप्रीम कोर्टात धाव
By Admin | Updated: June 30, 2016 12:34 IST2016-06-30T12:34:27+5:302016-06-30T12:34:33+5:30
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात हिमायत बेग याची फाशी रद्द केल्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी राज्य शासनाची सुप्रीम कोर्टात धाव
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३० - जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात हिमायत बेग याची फाशी रद्द केल्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. उच्च न्यायालयाने बेगची फाशी रद्द करून त्याला जन्मठेप सुनावली होती. 13 फेब्रुवारी 2010 रोजी कोरेगाव पार्क भागात असलेल्या जर्मन बेकरीमध्ये इंडियन मुजाहिदीनच्या यासीन भटकळ, हिमायत बेग यांनी स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात विदेशी नागरिकांसह १७ जण ठार झाले होते, तर ५५ जण गँभिरपणे जखमी झाले होते.