जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवाद्याला अटक
By Admin | Updated: July 3, 2014 14:10 IST2014-07-03T14:02:51+5:302014-07-03T14:10:59+5:30
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात सहभाग असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याला कोलकाता येथे अटक करण्यात आली आहे

जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवाद्याला अटक
ऑनलाइन टीम
कोलकाता, दि. ३ - पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात सहभाग असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याला कोलकाता येथून अटक करण्यात आली आहे. जाहिद हुसैन असे त्याचे नाव असून तो बांग्लादेशमधील मीरपूर येथील रहिवासी आहे. कोलकाता पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी कोलकाता रेल्वे स्टेशन बाहेरून हुसैनला अटक केली.
२०१० साली पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात हुसैन सहभागी होता. तसेच तो इंडियन मुजाहिद्दीनच्या म्होरक्यांच्या संपर्कात राहून त्यांना बनावट नोटा व दारूगोळा पुरवायचा अशी माहिती मिळत आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून हुसैनला गुरूवारी न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.