कोस्टलसाठी भूशास्त्रीय चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 02:23 IST2017-06-28T02:11:55+5:302017-06-28T02:23:19+5:30
महापालिकेने कोस्टल रोड बांधण्यापूर्वी भूशास्त्रीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आयटीआयच्या संशोधकांकरवी

कोस्टलसाठी भूशास्त्रीय चाचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेने कोस्टल रोड बांधण्यापूर्वी भूशास्त्रीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आयटीआयच्या संशोधकांकरवी याबाबतची चाचणी करण्यात येणार आहे. या अंतर्गत दगड, मातींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, अशा आशयाचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत सादर करण्यात आला आहे.
चार टप्प्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. एका महिन्याच्या कालावधीकरिता हे काम दिले जाणार असून, त्यानुसार
खर्चाचा अहवाल मागविला जाणार आहे. २५ नमुन्यांसाठी १ लाख १२ हजार ५०० रुपये अधिक सेवाकर घेण्याचे यासाठी निश्चित करण्यात येत असून, बुधवारी स्थायी समितीमध्ये यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.