शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खासदारकी फुकून टाकली, आता वन मॅन शो; उदयनराजेंचं 'मिशन' ठरलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 13:49 IST

माजी खासदार उदयनराजेंकडून शिवसेनेचा खरपूस समाचार

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्ही पाळत आलो आहोत. आम्ही सत्तेच्या मागे कधी गेलो नाही. जनतेसाठी खासदारकी फुकून टाकली. आता वन मॅन शो, अशा शब्दांत माजी खासदार आणि भाजपा नेते उदयनराजे भोसलेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना करणाऱ्या 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' वादग्रस्त पुस्तकावर उदयनराजेंनी जोरदार टीका केली. वादग्रस्त पुस्तक मागे घेतलं नसेल, तर मागे घ्यायला लावू. संबंधितांवर कारवाई करायला लावू, अशा शब्दांत उदयनराजे कडाडले. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. माझ्या बुद्धीला जे पटत नाही, ते मी करत नाही. त्यामुळेच निवडून आल्यानंतरही खासदारकीचा राजीनामा दिला. सत्तेच्या मागे आम्ही कधी गेलो नाही. माझं नातं सर्वसामान्य लोकांशी आहे. त्यांच्यासाठी मी जीव द्यायलाही तयार आहे. आम्ही काय करायचं हे इतरांनी सांगू नये, अशा शब्दांत उदयनराजेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा अप्रत्यक्षपणे समाचार घेतला. 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन भाजपावर टीका करताना राऊत यांनी भाजपामध्ये गेलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन केलं होतं. त्यावरुन उदयनराजे शिवसेनेवर कडाडले. शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो शिवरायांच्या वर का?, असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला. पक्षाला शिवसेना नाव दिलं, तेव्हा शिवरायांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? महाशिवआघाडीमधून शिव शब्द का काढला? सोयीप्रमाणे राजकारण करायचं ही यांची लायकी. शिववडा नावाचा वडापाव सुरु करण्यात आला. शिवाजी महाराजांचं नाव वडापावला कसं देता? आम्ही शिवसेना नावाला कधीही हरकत घेतली नाही. शिवसेनेनं नाव बदलून ठाकरे सेना करावं, अशा शब्दांत उदयनराजेंनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. यावेळी उदयनराजेंनी  शरद पवारांवरदेखील नाव न घेता जोरदार टीका केली. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज. अनेकांना जाणता राजाची उपमा देतात. त्याचाही मी निषेध करतो. जाणता राजा उपमा देताना विचार करण्याची गरज आहे, असं उदयनराजे म्हणाले.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाaaj ke shivaji narendra modi bookआज के शिवाजी नरेंद्र मोदीShiv Senaशिवसेना