शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा महायुद्धासाठी मेळावे, वज्रमुठीची तयारी; आचारसंहिता पुढच्या महिन्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 13:10 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर संयुक्त बैठक झाली. त्यात संयुक्त प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई : राज्यातील सत्तारूढ महायुती विरुद्ध विरोधी पक्षात असलेली महाविकास आघाडी असे विधानसभा निवडणुकीचे महायुद्ध तोंडावर असताना आता दोघांनीही संयुक्त प्रचारावर भर दिला आहे. मेळावे, जाहीर सभांद्वारे ऐक्याचे प्रदर्शन केले जाईल. निवडणूक आचारसंहिता सप्टेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता आहे पण त्या आधीच प्रचाराचा धुराळा उडविला जाणार आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर संयुक्त बैठक झाली. त्यात संयुक्त प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिली सभा कोल्हापुरात २० ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. तिन्ही नेत्यांच्या विभागीय पातळीवर सात सभा होतील, आठवी समारोपाची सभा मुंबईत होणार आहे. या शिवाय तिन्ही पक्षांचे नेते जिल्हाजिल्ह्यांत जाहीर सभा, मेळावे होतील. महायुतीमध्ये मतभेद नाहीत आणि आम्ही एकदिलाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचा संदेश त्यातून दिला जाईल. लोकसभा निवडणुकीत तीन पक्षांमध्ये समन्वय नसल्याची बाब समोर आली होती. हा समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने समन्वय समित्या जिल्हावार स्थापन करण्याचाही महायुतीचा विचार आहे.

ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री ?महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले. एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जावे आणि ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला पुढे येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून आघाडीत मतभेद असल्याचे चित्र सध्यातरी आहे. सर्व निर्णय एकत्र बसून करू असे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरविले आहे. 

प्रचाराचा नारळ कधी?महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा १६ ऑगस्टला मुंबईत होईल. काँग्रेसचे नेते १० ऑगस्टपासून मराठवाड्याच्या दाैऱ्यावर असतील. राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी २० ऑगस्टला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत सभा होईल. प्रचाराचा नारळ या निमित्ताने फोडला जाईल. 

टॅग्स :MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी