गांजा तस्करी: कनिसाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत
By Admin | Updated: August 19, 2016 23:00 IST2016-08-19T23:00:53+5:302016-08-19T23:00:53+5:30
सुमारे 22 लाखांच्या 150 किलो गांजा प्रकरणी अटक केलेली कनिसा खैरुल हिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला आता 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

गांजा तस्करी: कनिसाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १९ : सुमारे 22 लाखांच्या 150 किलो गांजा प्रकरणी अटक केलेली कनिसा खैरुल हिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला आता 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
हैद्राबाद येथून 150 किलोचा गांजा ठाणे, मुंबई आणि गुजरात परिसरात विक्रीसाठी घेऊन आलेल्या कनिसाला विटावा भागातून ठाणो पोलिसांनी 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 अटक केली. तिला आधी 9 ऑगस्ट आणि त्यानंतर 19 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. ती गरोदर असल्याचेही तिने आधीच न्यायालयाच्या निदर्शनास आणले. तिची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. तेंव्हा न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली