औरंगाबादमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: August 29, 2015 02:20 IST2015-08-29T02:20:47+5:302015-08-29T02:20:47+5:30

मुंबईतील गाजलेल्या शक्ती मिलमधील सामूहिक बलात्काराची पुनरावृत्ती गुरुवारी रात्री औरंगाबाद नजीकच्या चिकलठाणा शिवारात घडली. प्रियकरासोबत फिरण्यास गेलेल्या २२ वर्षीय

Gangrape rape in Aurangabad | औरंगाबादमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

औरंगाबादमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

औरंगाबाद : मुंबईतील गाजलेल्या शक्ती मिलमधील सामूहिक बलात्काराची पुनरावृत्ती गुरुवारी रात्री औरंगाबाद नजीकच्या चिकलठाणा शिवारात घडली. प्रियकरासोबत फिरण्यास गेलेल्या २२ वर्षीय तरुणीला व तिच्या प्रियकराला बेदम मारहाण करून नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले, की पीडित २२ वर्षीय तरुणी कामधंद्यानिमित्त हडको परिसरात राहते. एका तरुणासोबत तिची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे अधूनमधून ते सायंकाळनंतर फिरायला जात असत. २७ आॅगस्टला रात्री ८ वाजेनंतर ते मोटारसायकलवरून जालना रोडने केम्ब्रिज शाळेकडून सावंगीकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर आले. निर्मनुष्य ठिकाणी दुचाकी उभी करून ते गप्पा मारत असतानाच मोटारसायकलवरून आलेले २० ते २५ वयोगटातील चौघे जण त्यांच्या जवळ येऊन थांबले. दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांनी प्रियकराला पकडून ठेवले, तर इतर दोघांनी त्या तरुणीला जवळच्या शेतात ओढत नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. नराधमांच्या तावडीतून सुटल्यानंतर ते दोघे केम्ब्रिज चौकात आले आणि त्यांनी तेथे उभे असलेल्या पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना सोबत घेऊन घटनास्थळाकडे तातडीने धाव घेतली. मात्र तोपर्यंत ते चौघेही नराधम फरार झाले होते. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्पर कारवाई
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी पीडित आणि तिच्या प्रियकराकडून आरोपींचे वर्णन आणि वयाची माहिती घेतली. त्या आधारे शुक्रवारी दुपारपर्यंत चार संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Gangrape rape in Aurangabad