तरुणीवर मोटारीत सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: April 20, 2016 01:02 IST2016-04-20T01:02:42+5:302016-04-20T01:02:42+5:30

नोकरीनिमित्त अमरावतीहून पुण्यात आलेल्या तेवीस वर्षीय तरुणीवर मोटारीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Gangrape gang rape | तरुणीवर मोटारीत सामूहिक बलात्कार

तरुणीवर मोटारीत सामूहिक बलात्कार

पुणे : नोकरीनिमित्त अमरावतीहून पुण्यात आलेल्या तेवीस वर्षीय तरुणीवर मोटारीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.
विकी ऊर्फ विक्रांत सुधीर हिरवे (वय २७, रा. चौधरी पार्क, दिघी गावठाण), मनीष गोविंद राठी (वय ३३, रा. जगजणा आपर्टमेंट, गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव), मयूर राजेंद्र कांबळे (वय २९, रा. अप्पर इंदिरानगर) आणि निखिल राजेंद्र जाधव (वय २३, रा. गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव), अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी अमरावती येथील २३ वर्षीय पीडित तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० ते दि. १८ एप्रिल रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची अमरावतीची राहणारी असून, दीड वर्षापूर्वी शिक्षणासाठी पुण्यात आली होती. सध्या ती एका खासगी कंपनीत अकाऊंटंट म्हणून नोकरीस आहे. विकीबरोबर चार महिन्यांपूर्वीच तिची ओळख झाली होती. विकी याने रविवारी पीडित तरुणीला जेवायला बाहेर जाऊ, असे फोनवरून सांगितले. त्यानुसार सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही तरुणी विकी व मनीषसह वारजे पुला खालून मोटारीत बसून चांदणी चौकमार्गे वाकडच्या दिशेने गेले. मोटार बावधनच्या जवळ आल्यानंतर विकीने तरुणीवर चालू मोटारीत बलात्कार केला. तिथून मोटार पुढे नेल्यानंतर पिंपळे गुरव या ठिकाणी निखिल मोटारीत बसला. त्यानंतर ते देहू येथे त्यांच्या एका मित्राच्या साखरपुड्याला गेले. या वेळी पीडित तरुणीला मोटारीतच बसवून दरवाजे लॉक करण्यात आले. चार तास तिला मोटारीत कोंंडून ठेवण्यात आले.
तिथून सर्व जण रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास निघाले असता आणखी एक मित्र मयूर मोटारीत आला. वाटेत ते सर्वजण एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबल्यानंतर, मद्य प्राशन करून तरुणीलाही जबरदस्तीने मद्य पाजले. विकीच्या दोन मित्रांनी तरुणीवर अत्याचार केले. तरुणीने १०० क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, विकीने मोबाईल हिसकावून घेत तिला धमकावले. मनीषनेही मारहाण करून शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर तरुणीला वारजे माळवाडी बसस्थानकाजवळ सोडून दिले.

Web Title: Gangrape gang rape