शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

सुराज्यासाठी गणेशोत्सव

By admin | Updated: September 13, 2015 04:49 IST

आमच्या लहनपणी आम्ही औरंगाबादमध्ये गणेशोत्सवात गुलमंडीवर मेळे बघितले. ‘वऱ्हाड’कार लक्ष्मण देशपांडे हेही अशा मेळ्यांमध्ये उत्साहाने सहभागी व्हायचे. गुलमंडीवरच स्टेज उभारून

-प्रा. डॉ. शरद भोगले (लेखक मराठवाडा संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत.)आमच्या लहनपणी आम्ही औरंगाबादमध्ये गणेशोत्सवात गुलमंडीवर मेळे बघितले. ‘वऱ्हाड’कार लक्ष्मण देशपांडे हेही अशा मेळ्यांमध्ये उत्साहाने सहभागी व्हायचे. गुलमंडीवरच स्टेज उभारून आणि व्ही. गंगाजी यांच्या माइक सिस्टीमचा वापर करून, लाइट गेले तर त्यांच्याच गॅसबत्त्या वापरून असे मेळे व्हायचे. याशिवाय विद्वान लेखक, ख्यातनाम वक्ते यांची व्याख्याने आवर्जून आयोजित केली जायची. मराठीचे ख्यातनाम प्रा. वा. ल. कुलकर्णी, पारनेरकर महाराज अशा दिग्गजांची व्याख्याने आम्हाला ऐकायला मिळायची. याशिवाय वक्तृत्व स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, एकांकिका असे अनेक कार्यक्रम गणेशोत्सवात व्हायचे. विसर्जनाची मिरवणूक मछली खडक, गुलमंडी आणि औरंगपुऱ्यामध्ये बघणं हा सर्वांचाच आकर्षणाचा भाग होता. आता मात्र सगळेच बदलले. लोकमान्य टिळकांनी देवघरातील गणेशपूजा चौकाचौकात आणली. उद्दिष्ट होतं स्वराज्य. आता बदललेल्या परिस्थितीत उद्दिष्ट असलं पाहिजे सुराज्य!.आमच्या काळात लाऊड स्पीकरचा आवाज कमी पडला तर तो वाढवायला सांगायची वेळ यायची. आता डीजेचा आवाज कृपया कमी करा़ कारण आमच्या छातीत धडधड होते, अशी सांगायची वेळ आली आहे. पूर्वी स्टेजवर कमी लाइट पडला तर लोक शिट्ट्या मारायचे. आता गणेशाची मूर्तीपेक्षा लायटिंगच फार आहे. आमच्या काळात वर्गणी मागितली जायची, थोडी घासाघीस व्हायची आणि १०१ वरून शेवटी २१ रुपयांची पावती फाडली जायची; पण हा सगळा व्यवहार प्रेमाचाच. आता थोडा वेगळाच प्रकार होतो असं म्हणतात. अनेक परवानग्या लागतात. आता या सर्व परवानग्या एका खिडकीमध्ये उपलब्ध होणार असल्याची बातमी खूपच आनंददायक वाटली. वाढते ध्वनिप्रदूषण, प्रचंड रोशणाई, पर्यावरणस्नेही नसलेल्या गोष्टींचा वापर करून केलेली सजावट, थोडीशी अश्लीलता व प्रसंगी हिडीसपणा असलेले काही ठिकाणचे कार्यक्रम यामुळे आमची पिढी हा बदल मान्य करण्यास तयार नाही़ पण माझे असे मत आहे, की बदल हाच खरा स्थायी भाव आहे. या सर्व उत्सवांमध्ये तरुणाई मोठ्या संख्येने भाग घेत आहे. मुलंमुली, तरुणतरुणी प्रचंड उत्साहाने व ऊर्जेने सहभागी होतात. तरुणाईमधला उत्साह, प्रचंड ऊर्जा, अद्भुत कल्पनाशक्ती आणि उल्लेखनीय टीमवर्क म्हणजेच आजचा गणेशोत्सव.गरज आहे ती या बदलत्या स्वरूपाच्या गणेशोत्सवाला मोठ्या मनाने स्वीकारण्याची. त्याचे कारण असे, की ही तरुणाई यानिमित्ताने एकत्र येते. पुढे याच मंडळांना समाजोपयोगी कामांमध्ये आपल्याला समाविष्ट करता येईल. म्हणजेच सुराज्यासाठी गणेशोत्सव. मग ते वृक्षारोपण असेल, जलसाक्षरता प्रसार असेल, स्वच्छता अभियान असेल. ही तरुणाईच या देशाचा आधार आहे़ तरुणाई सर्वात जास्त प्रमाणात उपलब्ध असलेला आपला महान भारत देश जगात याबाबतीत अव्वल क्रमांकावर आहे. गरज आहे या उत्सवांना एक चांगले वळण देण्याची. हळूहळू इकोफें्रडली मूर्ती तयार होत आहेत, निर्माल्य नदीमध्ये अथवा पाण्यात न टाकता वेगळ्या कुंडामध्ये टाकले जात आहे, विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी करण्याच्या प्रयत्नाला हळूहळू यश येत आहे, एक गाव एक गणपती हळूहळू लोकांना पटेलही.धारोष्ण दूध, साजूक तूप, रसरशीत भाज्या आणि फळे लहानपणी खायला मिळालेल्या सुदैवी पिढीचे आम्ही प्रतिनिधी आहोत आणि प्रदूषणाची शिकार बनलेली आमची तरुणाई आहे. या तरुणाईला जर योग्य वळण दिले तर प्रदूषणमुक्त, पर्यावरणस्नेही, सर्वांना आनंद देणारा गणेशोत्सव नजीकच्या भविष्यकाळात अनुभवणं सहज शक्य आहे.