शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

Ganesh Visarjan 2018 : राज्यभरात लाडक्या गणरायाला थाटात निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 03:02 IST

राज्यात ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला थाटात ढोल- ताशांच्या मिरवणुकीत वाजत-गाजत ‘बाप्पा, मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला.

मुंबई/पुणे/ नागपूर : राज्यात ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला थाटात ढोल- ताशांच्या मिरवणुकीत वाजत-गाजत ‘बाप्पा, मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. त्यासोबत गणेशोत्सवाची सांगता झाली. मुंबईच्या चौपाटीवर हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मुंबईच्या ‘लालबागचा राजा’ ला निरोप देण्यासाठी दादरला समुद्र किनारी असंख्य भाविक गोळा झाले होते. गिरगाव चौपाटी, जुहू, पवई आणि दादर चौपाटी या गणेश विसर्जनाच्या मुख्य स्थळांकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. नागपुरात फुटाळा तलाव, नाईक तलाव, सक्करदरा तलाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेशविसर्जन झाले. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून प्रशासनाने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.गणरायाच्या नामघोषात मंत्रोच्चार करत, ढोलताशांच्या गजरात आणि श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या रथाची आकर्षक सजावट करून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. सकाळी १०.३० च्या सुमारास सुरू झालेल्या मानाच्या पाच गणपतीच्या मिरवणुकीची सांगता ६.४५ वाजता झाली. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही मिरवणूक पार पडण्यास पावणेआठ तासांचा वेळ लागला.मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून मानाच्या पाचही गणपतीच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. शहराचे ग्रामदैवत व मानाचा पहिला कसबा गणपतीचे मांडवात १०.१५ वाजता आगमन झाले. त्यापूर्वी त्यांच्या नगारखान्याचे आगमन झाले. यानंतर महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आरती करून गणरायाला पुष्पहार अर्पण करण्यात आला़ यावेळी पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम, पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार उल्हास पवार आदी मान्यवरांसह मंडळाचे पदाधिकारी व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौरांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली़चांदीच्या पालखीत मानाचा पहिला कसबा गणपती विराजमान झाला होता. या गणपतीचे आगमन विसर्जन मार्गावर होताच क्षणी भाविकांनी गणपती बाप्पा मोरयाचा गजर केला. यावेळी या गणपतीचे दर्शन घेण्याकरिता भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. मिरवणुकीमध्ये देवळणकर आणि गायकवाड यांनी सनई चौघडा वादन केले. आहे. बँक आॅफ महाराष्ट्र आणि आर्ट आॅफ लिव्हिंगच्या पथकाने सामाजिक प्रबोधन करणारे हाती फलक धरून जनजागृती केली. अलका चौकात कसबा गणपती ३ वाजता दाखल झाला. त्यानंतर पुढे तो विसर्जनाकरिता मार्गस्थ झाला.तांबडी जोगेश्वरीच्या श्रींच्या पालखीच्या आकर्षक सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चांदीच्या पालखीची रंगीबेरंगी फुलांची आरास गणेशभक्तांच्या कौतुकाचा विषय ठरली. मिरवणूक रथासमोर सतीश आढाव यांचे नगारावादन झाले. बाळासाहेब आढाव यांच्या न्यू गंधर्व ब्रास बॅण्डने रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या गणेशभक्तांना ठेका धरण्यास भाग पाडले. याशिवाय महिलांच्या अश्व पथकाने मिरवणुकीची शोभा वाढविली. यावेळी रोटरी क्लबच्या सदस्यांनी सामाजिक संदेश देणारे फलक हाती घेतले होते.गुरुजी तालीम मंडळाच्या श्रींच्या विसर्जनाच्या रथाची सुंदर सजावट करण्यात आली होती. आकर्षक रंगाच्या फुलांची कलात्मक मांडणी करून मिरवणूक रथाची शोभा वाढवली. ढोल पथकांचे शिस्तबद्ध संचलन, जोडीला मोरयाचा गजर करण्यात येत होता़गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन झाले. नेहमीच्या दिमाखात मंडळाने यंदाही मिरवणूक काढली होती़मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीने यावर्षी विसर्जन मिरवणुकीकरिता शेषात्मक गणेशाचा देखावा तयार केला. विपुल खटावकर आणि राजेंद्र पाटील यांच्या सजावटीतून आकारास आलेल्या आकर्षक सजावटीने उत्सवात रंग भरला. शेषनागावर आरूढ असलेली गणेशाची भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तुळशीबाग श्रींची मिरवणूक अलका चौकात ५.४५ वाजता दाखल झाली.केसरीवाड्यातील गणेशोत्सवाला यंदा १२५ वर्षे पूर्ण झाल्याने मंडळाच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्याच्या कार्यात्मक आठवणींना उजाळा देण्यात आला. ध्वनिचित्रफितीद्वारे लोकमान्यांचे विचार यावेळी गणेशभक्तांपर्यंत पोहचविण्यात आले. यावेळी टिळकांचा साडेनऊ फूट ऊंचीचा पुतळा रथात ठेवण्यात आला होता. ६.३० च्या सुमारास केसरीवाड्याच्या श्रींचे अलका चौकात आगमन झाले. नटेश्वर घाटावर मानाच्या या पाचही गणरायांचे विसर्जन हौदात करण्यात आले.डीजे बंदीची कडक अंमलबजावणीउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विसर्जन मिरवणुकीत डीजे बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे़ शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक ध्वनी प्रदूषण होत असल्याचे दिसताच त्या मंडळाला सुरुवातीला अगोदर सूचना दिली जाते़ तरीही त्यांना आवाज कमी केला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे़ काही मंडळांचे मिक्सर पोलिसांनी जप्त केले आहेत़ डीजे बंदीच्या अंमलबजावणीमुळे मिरवणुकीतील आवाज मोठ्या प्रमाणावर कमी झाला असून, शहराच्या विविध उपनगरातून निघणाऱ्या मिरवणुकींमधील आवाजावर मर्यादा आल्या आहेत़ आवाजावर मर्यादा आल्याने या मिरवणुकाही लवकर संपत असल्याचे दिसत आहे़मानाच्या गणपतींचे विसर्जन-कसबा गणपती सायंकाळी ४ वाजता-तांबडी जोगेश्वरी ५़१४ वाजता- गुरुजी तालीम ५़३२ वाजता-तुळशीबाग ६़२५ वाजता- केसरी मराठा ७़०५ वाजता

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनMumbaiमुंबईPuneपुणेnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र