शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 09:32 IST

Ganesh Chaturthi 2025: पीओपीपासून गणेशमूर्ती बनविण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली. पण...

मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती बनविण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर मोठ्या संख्येने मूर्तीची ऑर्डर नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या मूर्तीचे नैसर्गिक स्रोतात विसर्जन करण्यावर घातलेली बंदी कायम आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मूर्ती तयार झाल्या तर काय करायचे, असा पेच मुंबई महापालिकेपुढे निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबत राज्य सरकार उच्च न्यायालयात कोणती भूमिका घेते, याकडे पालिकेचे लक्ष आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पालिका पावले उचलेल, असे सांगण्यात आले.

पीओपी मूर्ती बनविण्यावर न्यायालयाने बंदी घातली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. गेल्या आठवड्यातच या प्रकरणावर सुनावणी झाली. त्यात पीओपी संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लवचिक भूमिका घेतली. मंडळ आणि राज्य सरकारची भूमिका जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने पीओपीवरील बंदी उठवली. मात्र, या मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक स्रोतात करता येणार नाही हा निर्देश कायम ठेवला.पीओपी मूर्तीवरील बंदी उठल्याने मूर्तिकारांनी मूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याकडे घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या ऑर्डर मोठ्या संख्येने आल्या आहेत. घरगुती मूर्ती लहान असतात, त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करता येते. मात्र, मोठ्या उंचीच्या मूर्तीच्या विसर्जनाबाबत पेच निर्माण होऊ शकतो. फारतर दहा फुटांपर्यंतच उंची असलेल्या मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन होते. त्यापेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीचे विसर्जन शक्य नसते, असे सांगण्यात आले.

पालिकेची भूमिका काय?यासंदर्भात पालिकेची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एक वरिष्ठ पालिका अधिकारी म्हणाला, "तीन आठवड्यांत राज्य सरकार आपली भूमिका न्यायालयात मांडणार आहे. त्यानंतर सरकारची मार्गदर्शक तत्त्वे तयार होतील. त्यानुसार पालिका कार्यवाही करेल."

मोठे कृत्रिम तलाव बांधण्यावर मर्यादामोठ्या आकाराचे कृत्रिम तलाव बांधण्यात अनेक अडचणी आहेत. मुख्य अडचण आहे ती जागेची. शिवाय नेमक्या किती मोठ्या आकाराचे तलाव बांधायचे हाही प्रश्न आहे. समजा बांधले तरी मोठ्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर त्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण होणार आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र