शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

"गणपती दारू प्यायला म्हणून..."; उत्तम जानकरांच्या विधानानं वाद, भाजपा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 10:43 IST

हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी उत्तम जानकर यांनी केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटावर टीका होऊ लागली आहे. 

इंदापूर - बारामतीत बसवलेला दीड दिवसाचा गणपती दारू प्यायला म्हणून शरद पवारांनी त्याचे विर्सजन केले असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी केले. इंदापूरातहर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. उत्तम जानकर यांनी या भाषणातून अप्रत्यक्षपणे अजित पवार आणि इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला. मात्र जानकरांचं वादग्रस्त विधान सोशल मीडियात व्हायरल होत असून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपानेही उत्तम जानकर यांच्या विधानाचा आक्रमक समाचार घेतला आहे.

उत्तम जानकर म्हणाले की,  अख्खा महाराष्ट्र ज्यांना सलाम घालतो, त्यांना घरातूनच आव्हान निर्माण केले गेले. सगळ्या महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले. बारामतीतील गोरगरिब, शेतकरी, सामान्य महिला मजूर अशा सगळ्या भटक्या विमुक्तांसहित या लोकांची ही राजधानी..ही राजधानीच पडते की काय याची शंका तुम्हा आम्हा सगळ्यांना पडली होती. साहेबांनी बारामतीत दीड दिवसाचा गणपती बसवला होता. या गणपतीची लोकप्रियता एवढी वाढली होती की हा गणपती दूध प्यायचा म्हणून महाराष्ट्रभर बोलबाला झाला होता, मग एक दिवस बातमी आली हा गणपती दारू प्यायला, भ्रष्ट झाला म्हणून साहेबांनी दीड दिवसातच या गणपतीचं विसर्जन केले असं सांगत जानकरांनी अजितदादांवर टीका केली. 

तसेच गणपतीचं विसर्जन केल्यानंतर गणपतीच्या पायाजवळ हा उंदिरमामा राहिला होता. हा सगळ्या तालुक्याला मामा बनवणारा उंदिरमामा...इंदापूर तालुक्याचा मार्ग साहेब कसा काढणार यासाठी मी काळजीत होतो. मला वाटत होता एखादा खटका लावून, एखादा पिंजरा लावून या उंदिरमामाचा बंदोबस्त करतील पण साहेबांनी बुलडोझरच फिरवला अशा शब्दात उत्तम जानकरांनी दत्ता भरणे यांना टोला लगावला. 

उत्तम जानकरला चौकाचौकात ठोकू - भाजपा 

दरम्यान, उत्तम जानकरला जी भाषा कळते, त्याच भाषेत त्यांना उत्तर दिले पाहिजे. उत्तम जानकरला उलटा टांगून महाराष्ट्रात मारलं पाहिजे. हिंदूंच्या भावना इतक्या स्वस्त नाहीत, सकाळी सकाळी नवटाक मारून शरद पवारांच्या सभेतून वाट्टेल ते बरळणारे उत्तम जानकर या महाराष्ट्रात हिंदुत्ववादी जनता तुला चौकाचौकात बडवेल. ज्या धर्मात जन्माला आलाय, जो देव आपले आई वडील मानत होते, त्याची जाण तुम्ही ठेवली पाहिजे. व्होट जिहादमुळे मिळणाऱ्या आयत्या मतामुळे तुम्ही सोकावला. उत्तम जानकर तुला चौकाचौकात ठोकू. अट्टल दारूड्या आणि वाया गेलेल्या पुढाऱ्याच्या अतिशय घाणेरड्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असं सांगत भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी जानकरांच्या विधानाचा समाचार घेतला.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारindapur-acइंदापूरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४