पत्नीला मारण्याचा होता डाव

By Admin | Updated: May 17, 2016 05:29 IST2016-05-17T05:29:24+5:302016-05-17T05:29:24+5:30

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सुशांत साळुंखे उर्फ काला खट्टा याने शिवडीत गोळीबार केला.

The game was about to kill the wife | पत्नीला मारण्याचा होता डाव

पत्नीला मारण्याचा होता डाव


मुंबई : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सुशांत साळुंखे उर्फ काला खट्टा याने शिवडीत गोळीबार केला. या गोळीबारानंतर तो पत्नीलादेखील ठार मारण्याच्या प्रयत्नात होता, मात्र पत्नीने वेळीच दोन वर्षांच्या चिमुरडीसह पळ काढल्याने ती यातून बचावली. ही घटना रविवारी घडली. या प्रकरणी काला खट्टाचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
शिवडी परिसरात राहत असलेल्या गणेश पोळ याचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय साळुंखेला होता. याच संशयातून त्याने पोळवर गोळी झाडून त्याला जखमी केले.
त्याने पत्नीच्याही हत्येचा कट आखला. मात्र अनेकदा संधी हुकल्याची माहिती तपासात समोर आली. साळुंखेच्या संशयी वृत्तीला कंटाळून गेल्या दीड महिन्यापासून त्याची पत्नी डोंबिवली येथे वडिलांकडे राहण्यास गेली होती.
पत्नीचा खून करण्याच्या उद्देशाने रविवारी रात्री साळुंखेने डोंबिवली येथून पत्नीला आणि मुलीला
रिक्षातून पळवून नेण्याचा प्रयत्न
केला.
वाटेत मुलगी रडू लागली. याचाच फायदा घेत त्याच्या पत्नीने रिक्षा मध्येच थांबवली. मुलीला पाणी पाजून आणते, असे सांगून तेथून पळ काढला. याची माहिती तिने पोलिसांना दिली.
पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत साळुंखे तेथून पसार झाला. या प्रकरणी पत्नीचा जबाब नोंदवून आर. ए. के. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The game was about to kill the wife