शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जुगारामुळे एकाच वेळी दोन कुटुंबावर दुख:चा डोंगर; एकाची हत्या, दुसऱ्याला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:45 IST

Yavatmal Murder: यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात जुगार खेळताना झालेल्या वादातून एका व्यक्तीचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात जुगार खेळताना झालेल्या वादातून एका व्यक्तीचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी ६.०० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

संजय प्रभाकर कावरे (वय, ४३) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, संदीप सूर्यभान इसापुरे (वय, ४०) असे आरोपीचे नाव आहे. संजय आणि संदीप हे गणेशपूर येथील स्मशानभूमी परिसरात इतर लोकांसोबत जुगार खेळत होते. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून बाचाबाची झाली. काही वेळातच परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. हाणामारीदरम्यान संदीप जवळच पडलेला एक मोठा दगड उचलून संजयच्या डोक्यात घातला. 

आरोपीला अटकया घटनेत संजय गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात पोहोण्याआधीच त्याचा मृ्त्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपी संदीपला ताब्यात घेतले. तर, संजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तीन दिवसांत दोन हत्यामहत्त्वाचे म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच वणी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मंदार गावातील लेआउटमध्ये अज्ञात लोकांनी ६० वर्षीय वृद्धाची हत्या केली. त्या प्रकरणाचे गूढ अद्याप उलगडले नसताना गणेशपूरमध्ये आणखी एक खूनाची घटना घडली. सतत होणाऱ्या खून घटनांमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे गस्त वाढवण्याची आणि बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रYavatmalयवतमाळ