शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींना ‘लक्ष्मीदर्शन’ भोवणार

By admin | Updated: October 7, 2014 05:37 IST

येत्या १० दिवसांत (म्हणजे १५ आॅक्टोबरच्या मतदानापर्यंत) तुमच्या नशिबी ‘लक्ष्मीदर्शना’चा योग आहे. येणाऱ्या लक्ष्मीला नाकारू नका

नवी दिल्ली : येत्या १० दिवसांत (म्हणजे १५ आॅक्टोबरच्या मतदानापर्यंत) तुमच्या नशिबी ‘लक्ष्मीदर्शना’चा योग आहे. येणाऱ्या लक्ष्मीला नाकारू नका, असे सांगून केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते नितीन गडकरी यांनी मतदरांना पैसे घेऊन मतदान करण्यास उद्युक्त करण्याचा गुन्हा केला आहे, असा सकृद्दर्शनी निष्कर्ष काढत निवडणूक आयोगाने गडकरी यांना सोमवारी नोटीस काढली आहे.तुम्ही प्रचारसभेत केलेली अशा प्रकारची विधाने हा भारतीय दंड विधानाच्या कलम १७१ बी व १७१ ई अन्वये लाच देण्यास प्रोत्साहन देण्याचा गुन्हा आहे व तसे करून तुम्ही आदर्श निवडणूक आचारसंहितेचाही भंग केला आहे, असे आमचे प्रथमदर्शनी मत आहे, असे आयोगाने गडकरी यांना पाठविलेल्या नोटिशीत नमूद केले आहे.याप्रकरणी आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळावी यासाठी आयोगाने गडकरी यांना बुधवार ८ आॅक्टोबरच्या सा. ५ वाजेपर्यंतची मुदत दिली असून तोपर्यंत त्यांनी उत्तर न दिल्यास आयोग, पुन्हा तुम्हाला न विचारता निर्णय घेण्यास मोकळा असेल, असा इशाराही या नोटिशीत दिला गेला आहे.रविवारी ५ आॅक्टोबर रोजी निलंगा येथील प्रचारसभेत गडकरी यांनी केलेली जी आक्षेपार्ह विधाने, मूळ मराठीचे इंग्रजी भाषांतर करून, आयोगाने नोटिशीत उद््धृत केली आहेत ती अशी: आता मी तुमचे चेहरे पाहतो आहे व चेहऱ्यावरून भविष्य वर्तविण्याची कला मलाही थोडीफार अवगत आहे. येत्या १० दिवसात तुम्हाला ‘लक्ष्मीदर्शना’चा योग आहे. खास लोकांना विदेशी बॅ्रण्डची मिळेल,तर सामान्यांना देशी ब्रॅण्डची मिळेल. काय बरोबर आहेना? म्हातारीला लुगडं तर तरुणांना शर्ट-पॅन्ट देतील. आणि सर्व ‘गांधीवादी’ पाच हजार मागताहेत. या महागाईच्या दिवसांत एक गोष्ट लक्षात ठेवा, जे प्यायचे ते पिऊन घ्या, खायचे ते खाऊन घ्या. मिळेल ते ठेवून घ्या. हरामाचा पैसा गरिबाकडे जाण्याची हिच वेळ आहे. येणाऱ्या लक्ष्मीला नाही म्हणू नका. पण मतदान करताना विचार करा. तुमचे मत महाराष्ट्राच्या विकासासाठी असायला हवे. लातूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी गडकरी यांच्या या आक्षेपार्ह विधानांची माहिती ई-मेलने कळविल्यानंतर व सोबत त्या भाषणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही पाठविल्यानंतर आयोगाने ही कारवाई केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)