शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

'एक-एक किलो मटण घरापर्यंत पोहोचवलं, तरी आम्ही निवडणूक हारलो...', गडकरीं सांगितला भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 17:00 IST

गडकरींनी सांगितले, लोक पोस्टर्स लावून, खाऊ-पिऊ घालून निवडणुका जिंकतात, यावर माझा विश्वास नाही.

 भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी अत्यंत प्रसिद्द आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्याच एका निवडणूक प्रचाराचा किस्सा सांगितना, आपण मटण वाटूनही निवडणूक कशी हरलो हे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर, मतदार अत्यंत हुशार असतात. ते सर्वांनी दिलेला माल ठेऊन घेतात आणि ज्याला मत द्यायचे त्यालाच देतात, असे गडकरी म्हणाले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गडकरींनी सांगितले, लोक पोस्टर्स लावून, खाऊ-पिऊ घालून निवडणुका जिंकतात, यावर माझा विश्वास नाही. मी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मी सर्व प्रयोग करून चुकलो आहे. एकदा निवडणुकीत तर एक-एक किलो सावजीचे मटण घरी पोहोचवण्याचेही काम झाले. पण आम्ही निवडणूक हरलो.

लोक हुशार आहेत - गडकरी म्हणाले, लोक अत्यंत होशार आहेत. ते म्हणतात, जे देत आहेत ते ठेवूनघ्या. आपल्याच बापाचा माल आहे. मात्र मत त्यालाच देतात. ज्यांना त्यांना द्यायचे आहे. त्यामुळे, जेव्हा आपण आपल्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करता, तेव्हाच ते आपल्यावर विश्वास ठेवतात. त्याला कुठल्याही पोस्टर बॅनरची आवश्यकता लागत नाही. अशा मतदारांना, कुठल्याही प्रकारची आमिषं दाखविण्याची आवश्यकता नलते. कारण त्याला आपल्यावर विश्वास असतो आणि हा लाँग टर्न आहे, याला कुठलाही शॉर्टकट नाही.

नितिन गडकरी म्हणाले, लोक म्हणतात सर MP चे तिकीट द्या. नाही तर MLA चे तरी तिकीट द्या. नाही तर MLC तरी बनवा. हे नसेल तर आयोग तरी द्या. यांपैकी काहीच नाही, तर मेडिकल कॉलेज द्या. मेडिकल कॉलेज नाही तर, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा फिर Bed कॉलेज तरी द्या. हीही शक्य नसेल, तर प्रायमरी स्कूल तरी द्या. यातून शिक्षकांचा अर्धा पगार आम्हाला मिळेल. मात्र याने देश बदलत नाही.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाElectionनिवडणूकnagpurनागपूर