शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 19:10 IST

Maharashtra Assembly Election 2024 Explainer: गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात रंगदार लढत होताना दिसत आहे.

संजय तिपाले, गडचिरोली Maharashtra Vidhan Sabha 2024: महायुतीच्या बालेकिल्ल्याला निवडणुकीआधीच बंडखोरांनी हादरा दिला, तर महाविकास आघाडीची वाटही बंडखोरांनी अवघड केली. अशा परिस्थितीत महायुती गड राखणार की महाविकास आघाडी चमत्कार करणार, हे पाहणे मोठे रोमांचक ठरणार आहे.

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या आरमोरी, गडचिरोलीत सध्या भाजपचे वर्चस्व आहे, तर अहेरीचा रिमोट राष्ट्रवादीकडे (अजित पवार गट) आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दहा वर्षांच्या भाजपच्या सत्तेला सुरुंग लावला. त्यामुळे तिन्ही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही उमेदवार बदलाची खेळी काँग्रेसने केली आहे. भाजपने 'लाडकी बहीण'सह इतर योजनांचा प्रचार जोमात सुरु केला असून काँग्रेसने स्थानिक मुद्द्यांना ढाल बनवित लढाई सुरु केली आहे. बंडखोर कोणाचे गणित बिघडवितात, मतदार कोणाला साथ देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.

दोन ठिकाणी थेट, अहेरीत चौरंगी लढत अहेरी 

आरमोरी व गडचिरोलीत महायुती व महाविकास आघाडीत थेट लढत आहे; पण अहेरीत चौरंगी लढत होत आहे. तेथे महायुतीत भाजपच्या तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या शिलेदाराने बंडखोरी केली आहे. राजपरिवारातील तिघांमुळे अहेरीतील लढाई अधिक चुरशीची आहे.

कृष्णा गजबे हॅ‌ट्ट्रिक करतील का? 

काँग्रेसने आरमोरी व गडचिरोलीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली, तर भाजपने गडचिरोलीत विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांना बाजूला सारून नवा पैलवान मैदानात उतरविला आहे. यात कोण सरस ठरणार याची उत्सुकता आहे. आरमोरीत महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे हॅट्ट्रिक करणार काय, याकडेही नजरा खिळल्या आहेत.

राजपरिवाराच्या संघर्षात कोण मारणार बाजी? 

एक अपवाद अहेरीवर वगळता पाच दशकांपासून आत्राम राजपरिवाराची हुकूमत आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात शरद पवार गटाने त्यांची कन्या भाग्यश्री यांना मैदानात उतरविले आहे. सोबतच महायुतीत बंडखोरी करून धर्मरावबाबांचे पुतणे अम्ब्रीशराव अपक्ष लढत आहेत. काँग्रेसच्या हनमंतू मडावी यांनीही बंडाचे निशाण फडकावले आहे. दिग्गज नेते धर्मरावबाबांची शत्रुपक्षासह मित्रपक्ष भाजपने कोंडी केली आहे. हा चक्रव्यूह ते भेदणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.

निवडणुकीत महत्त्वाचे फॅक्टर 

बेरोजगारी, पायाभूत सुविधांचा अभाव, दळणवळणाच्या अडचणी, दुर्गम, अतिदुर्गम भागांत नागरिकांचे होणारे हाल हे प्रश्न ऐरणीवर आहेत. बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, पण सिंचनाच्या • सुविधा पुरेशा नाहीत. कोटगल, हल्दी-पुराणी, चेन्ना, कोसरी, कुडकुली, आदी प्रकल्पांचे काम रखडलेले आहे. वनउपजावर आधारित लघुउद्योग नाहीत. कच्चा माल परराज्यांत जातो. मोह, बांबूला उत्तम बाजारपेठ हवी. पर्यटनविकासाचाही बॅकलॉग आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gadchiroli-acगडचिरोलीarmori-acअरमोरीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी