गडचिरोली - वडसा येथे नाटय गृह उभारणीस 5 कोटी - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2016 13:39 IST2016-08-17T13:36:32+5:302016-08-17T13:39:52+5:30

झाडीपट्टी रंगभूमीचे माहेरघर असणाऱ्या वडसा (देसाईगंज) येथे अद्ययावत आणि वातानुकूलीत असे नाटयगृह उभारण्यासाठी 5 कोटी रुपये देण्याची घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

Gadchiroli - 5 crore for the construction of the play house at Wadsa - Sudhir Mungantiwar | गडचिरोली - वडसा येथे नाटय गृह उभारणीस 5 कोटी - सुधीर मुनगंटीवार

गडचिरोली - वडसा येथे नाटय गृह उभारणीस 5 कोटी - सुधीर मुनगंटीवार

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
गडचिरोली,दि.17:  झाडीपट्टी रंगभूमीचे माहेरघर असणाऱ्या वडसा (देसाईगंज) येथे अद्ययावत आणि वातानुकूलीत असे नाटयगृह उभारण्यासाठी 5 कोटी रुपये देण्याची घोषणा राज्याचे वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
 वडसा नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण मुनगंटीवार यांच्या हस्ते मंगळवारी रात्री झाले.  त्याप्रसंगी माता वार्ड येथील सभेत ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम हे होते. 
 या वेळी व्यासपीठावर खासदार अशोक नेते, स्थानिक आमदार कृष्णा गजबे, गट नेता किसन नागदेवे,  नगराध्यक्ष श्याम उईके, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, मख्याधिकारी तैमुर मुलाणी  आदींची उपस्थिती होती. 
 मातावार्डात आरक्षण क्र. 19 मध्ये सौर उर्जेवर आधारीत लघुपाणी पुरवठा योजना, माता वार्ड येथे कम्युनिटी हॉलचे बांधकाम, वडसा-आरमोरी मेन रोड आदर्श शाळा ते बिरसा मुंडा चौक व पुढे जानी राईसमिल पर्यंत रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण, नगर परिषद परिसरात डांबर रस्त्याचे नुतनीकरण, आंबेडकर वार्डात गौतम नगर येथे  रोड खडीकरण, बिरसा मुंडा चौकात सांस्कृतीक भवनचे बांधकाम, आठवडी बाजार, गजानन मंदीर, माता मंदीर व बाजार विभाग येथे 9 मिटर हायमास्ट लाईट कामाचे लोकार्पण झाले. 
तसेच गजानन मंदीर परिसरात पेव्हींग ब्लॉकचे बांधकाम करणे, धानगंज येथे सी.सी. रस्ता व नाली बांधकाम करणे व सर्व वार्डातील विकास कामे प्रगती पथावर असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाणून घेतली. यावेळी नगरातील नागरिक, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. 

Web Title: Gadchiroli - 5 crore for the construction of the play house at Wadsa - Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.