जी. श्रीकांत उत्कृष्ट जिल्हाधिकारी!

By Admin | Updated: April 21, 2017 00:25 IST2017-04-21T00:25:19+5:302017-04-21T00:25:19+5:30

अकोला : राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनामार्फत अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची निवड करण्यात आली आहे.

G. Srikanth excellent Collector! | जी. श्रीकांत उत्कृष्ट जिल्हाधिकारी!

जी. श्रीकांत उत्कृष्ट जिल्हाधिकारी!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार सन्मान

अकोला : राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनामार्फत अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची निवड करण्यात आली आहे. नागरी सेवा दिनानिमित्त शुक्रवार, २१ एप्रिल रोजी मुंबईतील ‘सह्याद्री’ राज्य अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्य शासनामार्फत राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिन प्रताप सिंह यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबाबतची माहिती शासनाच्या महसूल खात्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी शुक्रवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना दिली.
नागरी सेवा दिनानिमित्त २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता मुंबईतील मलबार हिलस्थित ‘सह्याद्री’ राज्य अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: G. Srikanth excellent Collector!