‘त्या’ विद्यार्थिनींचे भवितव्य अधांतरी

By Admin | Updated: November 2, 2016 05:00 IST2016-11-02T05:00:22+5:302016-11-02T05:00:22+5:30

निकषात बसत नसलेल्या राज्यातील ७७ नर्सिंग स्कूलची मान्यता भारतीय परिचर्या परिषदेने एका आदेशाने रद्द केली.

The future of those students' students is final | ‘त्या’ विद्यार्थिनींचे भवितव्य अधांतरी

‘त्या’ विद्यार्थिनींचे भवितव्य अधांतरी

विलास गावंडे,

यवतमाळ- निकषात बसत नसलेल्या राज्यातील ७७ नर्सिंग स्कूलची मान्यता भारतीय परिचर्या परिषदेने एका आदेशाने रद्द केली. त्यामुळे या स्कूलमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या १५४० विद्यार्थिनींचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी आहे. निकषात बसत नसतानाही प्रवेश देऊन या महाविद्यालयांनी खेळ चालविला, अशी भावना विद्यार्थिनींमध्ये निर्माण झाली आहे.
भारतीय परिचर्या परिषद दिल्लीकडून दर तीन वर्षांनी नर्सिंग स्कूलची तपासणी केली जाते. शिवाय प्रथम वर्ष प्रवेशासाठी दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. नवीन शैक्षणिक सत्रासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. या दृष्टीने आवश्यक ती तपासणी परिषदेकडून झाली. यात काही नर्सिंग स्कूलने निकष पूर्ण केले नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार २९ आॅक्टोबर रोजी मान्यता रद्द झालेल्या नर्सिंग स्कूलची यादी परिषदेने जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील ७७ स्कूलचा समावेश आहे. या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या १५४० विद्यार्थिनींना इतर ठिकाणच्या प्रवेशाची दारे बंद झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या भवितव्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
बारावीनंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. अर्धेअधिक शैक्षणिक सत्र संपले असल्याने इतर अभ्यासक्रमालाही या विद्यार्थिनी मुकणार आहे. या परिस्थितीत काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे.
>मान्यता रद्द झालेल्या नर्सिंग स्कूलची जिल्हानिहाय संख्या
वर्धा चार, भंडारा तीन, यवतमाळ तीन, बुलडाणा तीन, गडचिरोली दोन, गोंदिया तीन, चंद्रपूर एक, अमरावती एक, अकोला एक, नांदेड दोन, अहमदनगर आठ, हिंगोली तीन, परभणी सात, औरंगाबाद सहा, मुंबई एक, नाशिक तीन, सांगली तीन, बीड चार, ठाणे एक, रत्नागिरी एक, लातूर पाच, उस्मानाबाद एक, नंदूरबार दोन, सोलापूर दोन.

Web Title: The future of those students' students is final