नव्या सरकारच्या हाती कॅम्पाकोलावासियांचे भविष्य
By Admin | Updated: October 27, 2014 13:00 IST2014-10-27T12:26:17+5:302014-10-27T13:00:39+5:30
नवे सरकार तयार असेल तर कॅम्पाकोला सोसायटीला नियमित करण्याबाबत विचार करू असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याने रहिवाशांचे भविष्य आता नव्या सरकारच्या हाती आहे.

नव्या सरकारच्या हाती कॅम्पाकोलावासियांचे भविष्य
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - नवे सरकार तयार असेल तर कॅम्पाकोला सोसायटीला नियमित करण्याबाबत विचार करू असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोलावासियांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यामुळे कॅम्पाकोलावासियांचे भविष्य आता नव्या सरकारच्या हातात आहे. दरम्यान याप्रकरणाची सुनावणी एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
अनधिकृत बांधकाम केल्यामुळे सर्वोच्च न्यालयाने कॅम्पाकोला सोसायटीतील इमारतींचे अनधिक-त मजले पाडून टाकण्याचे आदेश दिले होते, मात्र रहिवाशांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर रहिवासी व न्यायालयादरम्यान संघर्ष सुरू झाला होता. मात्र आता नवे सरकार स्थापन होत असून सरकारची परवानगी असल्यास इमारतीबाबत विचार करू असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.