परळीत आज होणार अंत्यसंस्कार
By Admin | Updated: June 4, 2014 01:29 IST2014-06-04T01:29:43+5:302014-06-04T01:29:43+5:30
महाराष्ट्राने ज्यांच्याकडे आशेने पाहिले त्या प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्यापाठोपाठ गोपीनाथ मुंडे यांच्याही अकाली जाण्याने महाराष्ट्र आणि त्यातही मराठवाडा शोकसागरात बुडाला.

परळीत आज होणार अंत्यसंस्कार
>कार्यकत्र्याच्या भावनांचा बांध फुटला : केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री उपस्थित राहणार
महाराष्ट्राने ज्यांच्याकडे आशेने पाहिले त्या प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्यापाठोपाठ गोपीनाथ मुंडे यांच्याही अकाली जाण्याने महाराष्ट्र आणि त्यातही मराठवाडा शोकसागरात बुडाला. ही दु:खद बातमी नितीन गडकरी यांच्या हवाल्याने आल्यानंतरही लोकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. हा धक्का महाराष्ट्रासाठी जबर आणि अनपेक्षित होता. मुंडे यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी चार वाजता परळी-बीड राज्य मार्गावरील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखाना परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुंबईहून विशेष विमानाने खा. मुंडे यांचे पार्थिव लातूर येथे बुधवारी सकाळी 1क् वाजता आणण्यात येणार आहे. तेथून परळीत आणले जाईल. यशश्री निवासस्थानी कुटुंबीयांना अंत्यदर्शनासाठी अर्धा तास ठेवले जाईल. त्यानंतर 11 ते 2 या कालावधीत तोतला मैदानावर सर्वाना दर्शनासाठी ठेवण्यात येईल. याच तोतला मैदानावर त्यांचा सत्कार होणार होता. सजवलेल्या ट्रकमधून पांगरी वैद्यनाथ कारखाना परिसरात पार्थिव आणण्यात येईल आणि दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल.
कारखाना परिसराची पाहणी पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केली. अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय
गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, माजी मुख्यमंत्री नारायण राणो, राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती
राहणार आहे.
महाराष्ट्राने अलीकडे गमावलेले हे तिघेही नेते मुंबईत वरळीच्या पूर्णा या एकाच इमारतीत राहत होते. या विचित्र योगायोगाचीही राज्यभर चर्चा होती.