उस्मानाबादमध्ये नऊ भाविकांवर अंत्यसंस्कार

By Admin | Updated: July 21, 2016 05:09 IST2016-07-21T05:09:01+5:302016-07-21T05:09:01+5:30

मंगळवारी अपघातात मृत्यू झालेल्या कनगरा येथील नऊ भाविकांवर बुधवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Funeral on nine devotees in Osmanabad | उस्मानाबादमध्ये नऊ भाविकांवर अंत्यसंस्कार

उस्मानाबादमध्ये नऊ भाविकांवर अंत्यसंस्कार


उस्मानाबाद : गाणगापूरकडे दत्त दर्शनासाठी निघालेल्या अन् मंगळवारी अपघातात मृत्यू झालेल्या कनगरा येथील नऊ भाविकांवर बुधवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
एकाच वेळी गावात चार सरण पेटल्याचे दुर्दैवी चित्र होते. नातेवाईकांसह ग्रामस्थांच्या आक्रोशामुळे गावावर शोककळा पसरली होती.
मंगळवारी गुरूपौर्णिमेनिमित्त हे भाविक श्री क्षेत्र गाणगापूरकडे निघाले होते. त्यांच्या जीपला भीषण अपघात झाला होता. आळंद येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मध्यरात्री नऊ भाविकांचे मृतदेह कनगऱ्यात आणण्यात आले.
अपघातात जीपमधील १४ भाविक जखमी झाले असून, त्यांच्यावर आळंद येथील शासकीय रुग्णालय तसेच युनायटेड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Funeral on nine devotees in Osmanabad