Funds will be obtained from district planning for boundary calculation | हद्दवाढ मोजणीसाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळणार

हद्दवाढ मोजणीसाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळणार

ठळक मुद्देहद्दवाढ मोजणीसाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळणारमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांचे प्रयत्न

कोल्हापूर : राज्यातील सर्व नगरपरिषद व नगर पंचायतीच्या हद्दवाढ मोजणीकरीता जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विशेष प्रयत्न केले होते.

शिरोळ नगरपरिषदेच्या हद्दवाढ मोजणीसाठी निधी देण्यासंदर्भात मंत्री यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली होती. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तरीय योजनेमार्फत नगरविकास विकास विभागाच्या माध्यमातून शिरोळ नगरपरिषदेच्या हद्दवाढ मोजणीसाठी निधी मिळणार आहे.

शिरोळ नगरपरिषदेसह राज्यातील सर्वच नगरपरिषद व नगर पंचायतीच्या हद्दवाढ मोजणीकरीता जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच अनेक वर्षे रखडलेल्या हद्दवाढ मोजणीचा प्रश्न आणि निधीची उपलब्धता यामुळे विकास कामाला चालना मिळेल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Funds will be obtained from district planning for boundary calculation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.