शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयला काही दिवसांसाठी ’टाळे’ ?

By admin | Updated: June 19, 2015 01:19 IST

एफटीआयआयच्या (फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्याप्रकरणी सहा दिवसांपासून सुरू असलेल्या

पुणे : एफटीआयआयच्या (फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्याप्रकरणी सहा दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अद्यापही दिशा गवसलेली नाही. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद देऊनही आंदोलन मागे घेण्याची कोणतीच सुचिन्हे दिसत नसल्यामुळे आता शासकीय पातळीवर मुस्कटदाबीचे हत्यार उपसण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी दि. ३० जूनपर्यंत आंदोलन मागे न घेतल्यास संस्थेला काही दिवस तरी टाळे ठोकले जाण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.चौहान हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना चित्रपटाविषयीचे ‘व्हिजन’ नसल्याने यापदासाठी ते लायक व्यक्ती नसल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाऊ लागल्याने मंत्रालयाला आंदोलनाची दखल घेण्यास भाग पडले. मात्र, मंत्रालयाने चर्चेसाठी कवाडे खुली करून विद्यार्थ्यांनी वर्ग पुन्हा सुरू करावेत, असे पत्रात नमूद केले. तरीही विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. आंदोलन मागे घेण्याबाबत कोणतेच भाष्य ते करीत नसल्यामुळे मंत्रालयाने आता मुस्कटदाबीचे तंत्र अवलंबिण्याचे ठरविले असल्याचे समजते. एक पाऊल पुढे टाकूनही विद्यार्थ्यांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यामुळे विद्यार्थ्यांना संस्थेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भूमिकेवर तटस्थ असून, यापैकी कोणीही एक पाऊल मागे घेण्यास तयार नाही. विद्यार्थ्यांनीच हे आंदोलन मागे घ्यावे, यासाठी शासनाने दि. ३० जून ही डेडलाईन ठरविली आहे. विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले नाही, तर त्यानंतर परिस्थिती निवळेपर्यंत एफटीआयआयला टाळे ठोकण्याची शक्यता आहे. यापूर्वी डॉ. मोहन आगाशे यांनी अभ्यासक्रमाचे स्ट्रक्चर बदलविण्याचा प्रस्ताव दिल्यामुळे त्यांना हटविण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.