न्यायाधीशांसमोरच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: August 17, 2014 01:26 IST2014-08-17T01:26:10+5:302014-08-17T01:26:10+5:30
प्रकाश अजरुन काळे ऊर्फ पक्या दारूवाला (26) याने न्यायाधीश, वकील आणि पोलिसांसमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

न्यायाधीशांसमोरच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
>औरंगाबाद : कोर्टाचे नियमित कामकाज सुरू असताना आरोपींना जामिनावर मुक्त केल्यास ते आपल्याला जिवे मारून टाकतील, असे म्हणत प्रकाश अजरुन काळे ऊर्फ पक्या दारूवाला (26) याने न्यायाधीश, वकील आणि पोलिसांसमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात घडली.
प्रकाश काळे याच्या तक्रारीवरून 25 जुलै रोजी आरोपी विनोद मारुती भालेराव, विजय मारोती भालेराव, मंगेश मारोती भालेराव आणि एका अल्पवयीन मुलाविरोधात मारहाण करून 11 हजार 5क्क् रुपये आणि एक मोबाईल हॅण्डसेट हिसकावून नेल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात भालेरावबंधुना 16 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडी सुनावली. या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला मुख्य न्यायदंडाधिकारी डी.के. अनभुले यांच्यासमोर हजर केले. सुनावणी सुरू असताना आरोपींना जामीन देऊ नका, अन्यथा ते मला जिवे मारून टाकतील, असे म्हणत प्रकाश काळे याने रॉकेल स्वत:च्या अंगावर ओतून घेतले.