अंधांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

By Admin | Updated: January 22, 2015 02:05 IST2015-01-22T02:05:28+5:302015-01-22T02:05:28+5:30

‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब)’ या संस्थेने राज्यातील १०५ अंध शाळांना मोफत शैक्षणिक पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे.

Free Textbooks to Get Blind | अंधांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

अंधांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

राम देशपांडे ल्ल अकोला
अंधांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाशज्योती निर्माण करण्याचे कार्य करणाऱ्या ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब)’ या संस्थेने राज्यातील १०५ अंध शाळांना मोफत शैक्षणिक पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रेल लिपीतील साहित्य तयार करणे महागात पडत असले, तरी इंग्रजी आणि मराठी माध्यमातील पहिली ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पाठ्यपुस्तकांवर ‘नॅब’च्या वतीने ७५ टक्के सूट दिली जाते. ६५ वर्षांपासून केवळ दोन यंत्रांच्या साहाय्याने ब्रेल पाठ्यपुस्तके तयार करणाऱ्या ‘नॅब’ला वाढत्या छपाई मूल्यामुळे पाठ्यपुस्तकांचा दर्जा राखणेदेखील कठीण झाले होते.
अशा स्थितीत केंद्र शासनाने डेहरादूनच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हिज्युअल हॅण्डीकॅप या संस्थेच्या माध्यमातून नॅबला १ कोटी ७५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्यातील १०५ अंध शाळांना मोफत शैक्षणिक पाठ्यपुस्तके पुरविण्यात येईल़

केंद्राकडून मिळणाऱ्या निधीतून ब्रेल साहित्य तयार करण्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री खरेदी केली जाईल. या माध्यमातून तयार केली जाणारी नवी पाठ्यपुस्तके राज्यातील १०५ अंध शाळांना मोफत पुरविण्यात येईल़ पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अंध शाळांचा समावेश आहे.
- महेंद्र मोरे, व्यवस्थापक, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, मुंबई

Web Title: Free Textbooks to Get Blind