मुंबई खड्डेमुक्त करा, न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं
By Admin | Updated: July 30, 2016 18:12 IST2016-07-30T18:02:28+5:302016-07-30T18:12:06+5:30
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग 19 ऑगस्टपर्यत खड्डेमुक्त करा, असे आदेशच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत

मुंबई खड्डेमुक्त करा, न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 30 - पावसाळ्यात खड्ड्यांमुळे मुंबईकर रखडत प्रवास करत असताना न्यायालयानेही खड्ड्यांवरुन राज्य सरकारला खडसावले आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग 19 ऑगस्टपर्यत खड्डेमुक्त करा, असे आदेशच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. दोन्ही महामार्गावर 137 खड्डे असल्याची माहिती यावेळी राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे.
राज्य सरकारने दोन्ही महामार्गांवरील 3247 खड्डे बुजवल्याचा दावा केला न्यायालयात केला होता. मात्र न्यायालयाने पाहणी करण्याचे आदेश दिल्यानंतर सरकारी वकिलांनी महामार्गांवर 137 खड्डे असल्याची माहिती न्यायालयात दिली होती. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खड्ड्यांच्या प्रश्नावरुन खडसावलं असून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग 19 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त झाले पाहिजेत, असं बजावलं आहे.