बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक

By Admin | Updated: June 10, 2014 23:28 IST2014-06-10T22:40:54+5:302014-06-10T23:28:18+5:30

बनावट कागदपत्रांद्वारे १ कोटी १६ लाख रूपयांचे गृहकर्ज घेऊन अनेक बॅंकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली.

Fraud by fake papers | बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक

बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक

पुणे : बनावट कागदपत्रांद्वारे १ कोटी १६ लाख रूपयांचे गृहकर्ज घेऊन अनेक बॅंकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यनायदंडाधिकारी ए.बी.शेख यांनी दोघांना १४ जूनपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
विकास सुभाष कदम (वय ३२, रा. यमुनानगर, निगडी), डेव्हीड पीटर जोसेफ (वय ३८, रा. कळस, ता. हवेली) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार सुमित राजेंद्र गांधी (वय २६, रा. चिंचवड) याच्यासह संदेश राजाराम पालकर (वय ३४,) प्राची संदेश पालकर (वय २५, दो. रा. चिंचवड), रचना विकास कदम (वय ३२, रा. यमुनानगर, निगडी), धीरज नटवरलाल लसारिया (वय ३८, रा. निगडी), मोना जुगराज चौधरी (रा. गुरव पिंपळे), मांगीलाल धिसाजी चौधरी (वय ३४, रा. पिंपरी), रमेशकुमार चुन्नीला चौधरी (वय ३१, रा. शिवाजीनगर) आणि कोल्हापूर ठाणे जनता सहकारी बॅंकेचे तत्कालीन व्यवस्थापक रविंद्र शामराव तिळगुळकर यांना अद्याप अटक केलेली नाही.
याप्रकरणी दिलीप लब्बा यांनी फिर्याद दिली आहे.
बनावट कागदपत्रांद्वारे खाते उघडून १ कोटी १६ लाख रूपयांचे कर्ज घेतले. आरोपींनी मिळून कर्जाची परतफेड न करता अनेक बॅंकाची फसवणूक केली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी आरोपींनी बनावट कागदपत्रे कोठे तयार कली. फसवणूक केलेली रक्कम त्यांनी कोठे ठेवली आहे. बनावट कागदपत्रासाठी लागणारे साहित्य कोठून विकत घेतले याचा तपास करण्यासाठी दोघांना पोलिस कोठडी द्यावी असा युक्तिवाद सरकारी वकिल माधव पौळ यांनी केला. न्यायालयाने ती ग्रा‘ धरली.

Web Title: Fraud by fake papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.