चार वर्षीय बालिकेवर १५ वर्षीय मुलाचा बलात्कार
By Admin | Updated: June 23, 2016 00:18 IST2016-06-23T00:18:04+5:302016-06-23T00:18:04+5:30
अल्पवयीन आरोपीस बाळापूर पोलिसांकडून अटक.

चार वर्षीय बालिकेवर १५ वर्षीय मुलाचा बलात्कार
बाळापूर(जि अकोला) : येथून जवळच असलेल्या खामखेड येथील चार वर्षीय बालिकेवर १५ वर्षीय मुलाने घरात खेळत असताना अमानुषपणे बलात्कार केला. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी २१ जूनच्या उत्तर रात्री अल्पवयीन आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली.
खामखेड येथील रहिवासी असलेल्या १५ वर्षीय मुलाने नात्याने त्याची चुलतबहीण असलेल्या चार वर्षीय बालिकेवर घरात खेळत असताना बलात्कार केला. याप्रकरणी पीडित बालिकेच्या मातेच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी सदर अल्पवयीन आरोपीस अटक करून त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२), (आय) तसेच बालिकांचे लैंगिक शोषण व अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.