Four-wheeler vehicles will have to pay double tolls if not fastag | फास्टॅग नसल्यास चारचाकी वाहनांना द्यावा लागणार दुप्पट टोल
फास्टॅग नसल्यास चारचाकी वाहनांना द्यावा लागणार दुप्पट टोल

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या २१ नोव्हेंबर २०१४ च्या राजपत्रानुसार ही कार्यवाही केली जाणाररस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने १९ जुलै २०१९ रोजी विशेष निर्देश पत्रही जारी १ डिसेंबर २०१९ पासून पथकर फास्टॅग च्या माध्यमातून घेतला जाणार

सोलापूर : केंद्र सरकारच्या निदेर्शानुसार १ डिसेंबर २०१९ पासून पथकर नाक्यावर चार चाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांकडून १ डिसेंबर २०१९ नंतर दंडापोटी दुप्पट पथकर वसुली करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.

केंद्र सरकारच्या २१ नोव्हेंबर २०१४ च्या राजपत्रानुसार ही कार्यवाही केली जाणार आहे. या राजपत्रानुसार रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने १९ जुलै २०१९ रोजी विशेष निर्देश पत्रही जारी केले आहे. त्यांनी सांगितले की १ डिसेंबर २०१९ पासून पथकर फास्टॅग च्या माध्यमातून घेतला जाणार आहे. यानंतर रोखीने पथकर देणा?्या वाहनचालकांना दंडापोटी दुप्पट टोल आकारला जाणार आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनाने फास्टॅग साठीच्या लेनमध्ये प्रवेश केल्यास अशा वाहनांकडूनही दुप्पट पथकर आकारला जाणार आहे.

फास्टॅग खरेदीसाठी  आवश्यक कागदपत्रे....
वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट, वाहनधारकांचे पासपोर्ट साईज फोटो, केवायसीसाठी कागदपत्रे ( वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार ओळखपत्र किंवा पासपोर्ट )

फास्टॅग कोठे मिळेल ........
 सोलापूर पुणे महामार्गावरील सावळेश्वर, वरवडे पथकर नाका, तामलवाडी, येडशी, पारगांव पथकर नाका.आयसीआयसीआय, एचडीएफसी, अक्सिस, इंडस आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखा याशिवाय इंटरनेटवरील वेबसाईटवरही खरेदी करता येईल.

फास्टॅगचे फायदे.........
पथकर नाक्यावर थांबावे लागणार नाही, इंधन बचत, पर्यावरण संवर्धन, वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. फास्टॅग वर मिळणार कॅशबॅक -  केंद्र सरकारच्या धोरणानुसार फास्टॅगद्वारे पथकर देणारे वाहनांना ३१ मार्च २०२० पर्यंत २.५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

Web Title: Four-wheeler vehicles will have to pay double tolls if not fastag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.