मध्य रेल्वेतर्फे चार विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 01:39 IST2016-05-08T01:39:12+5:302016-05-08T01:39:12+5:30

उन्हाळी सुट्टीसाठी मध्य रेल्वेतर्फे ४ नव्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. ०२१३३ एसी विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १० आणि १७ मे रोजी रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी

Four Special Trains By Central Railway | मध्य रेल्वेतर्फे चार विशेष गाड्या

मध्य रेल्वेतर्फे चार विशेष गाड्या

मुंबई : उन्हाळी सुट्टीसाठी मध्य रेल्वेतर्फे ४ नव्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. ०२१३३ एसी विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १० आणि १७ मे रोजी रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल तर मंगलोर-लोकमान्य टिळक टर्मिनस ०२१३४ एसी विशेष गाडी १० मे आणि १७ मे रोजी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थीवीम, करमाळी, मडगाव, कारवार, कुमटा, भटकळ, मुक्कांबिका रोड, कुंदापुरा, उडिपी आणि मुलकी स्थानकावर थांबेल. ०२१३३ या एसी विशेष लोकलचे आरक्षण ८ मे रोजी सुरू होईल. यासाठी विशेष दर आकारले जातील.

Web Title: Four Special Trains By Central Railway