विदर्भात पावसाचे चार बळी
By Admin | Updated: July 25, 2016 22:47 IST2016-07-25T22:47:48+5:302016-07-25T22:47:48+5:30
विदर्भात पावसासंबंधी विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला.

विदर्भात पावसाचे चार बळी
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - विदर्भात पावसासंबंधी विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. नागपूर आणि अमरावती विभागांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अमरावती विभागातील दोन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. दरम्यान नागपूरलगत गोंडखैरी टोलनाक्याजवळ सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास मोटरसायकलवर वीज पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात दोन पाऊसबळींची नोंद झाली.दरम्यान राजुरा तालुक्यात एक महिला वाहून गेली तर पवनार येथील धाम नदीवर पोहायला गेलेल्यांपैकी एक जण वाहून गेला तर दुसऱ्याला वाचविण्यात यश आले.