शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

दिवस ‘लोक’मताचा ! मतदारराजा आज देणार महाकौल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:18 PM

मतदानासाठी वेळ काढा जबाबदारी पार पाडा

मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या मतदारां पैकी शेवटच्या मतदारापर्यंत उभ्या असलेल्या मतदाराला टोकन वजा चिठ्ठी दिली जाणार असून रांगेत उभ्या असलेल्या मतदारांचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रि या सुरू राहणार आहे.त्यानंतर आलेल्या कोणत्याही मतदारांना मतदान करता येणार नाही. जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरने ईव्हीएम पोहोचविणारमतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्रॉंग रूमवर आणल्या जातील तिथे पुन्हा व्यविस्थत तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका कंटेनरमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत विधानसभा क्षेत्रातील स्ट्रॉंग रूममध्ये पोहोचवल्या जातील.

काही गडबड झाली तर काय?निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी प्रभारी अधिकारी यांची निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका घेऊन निवडणुकीबाबत योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. रजेवर असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक बंदोबस्तासाठी ड्युटी वर परत बोलविण्यात आलेले आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्या करता पोलिस ठाण्यांमध्ये राखीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. प्रत्येक पोलिस ठाणे स्तरावर लाठी, हेल्मेट ढाल, अश्रूधूर आदी साधनांसह प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना सज्ज ठेवण्यात आलेले आहे.

जलद प्रतिसाद पथक तैनातकायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २४ तास पोलीस व राज्य राखीव दल या यंत्रणा सज्ज असून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर दंगा काबू योजना राबविण्यात येत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस ठाणे हद्दीत कॉर्नर मिटिंग, पायी गस्त, प्रभावीपणे करण्यात येत आहे. तर पोलीस मुख्यालयात जलद प्रतिसाद पथक व दंगल नियंत्रण पथक तैनात ठेवण्यात आलेले आहे. आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होणार नाही यासाठी पालघर पोलीस २४ तास सतर्क राहणार असून कोणताही अनुचित प्रकार घडत असल्याचे कळल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

दिवस ‘लोक’मताचा!मतदान सकाळी ७ वाजताच सुरू होणार असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवापासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँक, पोस्टाचे पासबुक, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत स्मार्ट कार्ड, जॉब कार्ड, छायाचित्र असलेली निवृत्तीवेतन कागदपत्रे, आधार कार्ड

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalghar-pcपालघर