सोलापूर जिल्ह्यातून चार आमदार पुत्रांचे अर्ज

By Admin | Updated: February 7, 2017 23:54 IST2017-02-07T23:54:11+5:302017-02-07T23:54:11+5:30

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सोमवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात तीन आमदारपुत्रांनी अर्ज दाखल केले आहेत.

Four MLAs from Solapur district | सोलापूर जिल्ह्यातून चार आमदार पुत्रांचे अर्ज

सोलापूर जिल्ह्यातून चार आमदार पुत्रांचे अर्ज

सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सोमवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात तीन आमदारपुत्रांनी अर्ज दाखल केले आहेत. माढाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित यांनी मोडनिंब जि.प. गटातून, तर दुसरे पुत्र विक्रमसिंह शिंदे यांनी बेंबळे पंचायत समिती गटातून राष्ट्रवादीतर्फे अर्ज दाखल केले आहेत. पंढरपूरचे काँग्रेसचे आ. भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी कासेगाव जि.प. गटातून काँग्रेसतर्फे अर्ज दाखल केला. सोलापूर मनपासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉ. किरण रिंगणात आहेत.

Web Title: Four MLAs from Solapur district