एरंडोलनजीक अपघातात ४ ठार, १३ जखमी

By Admin | Updated: May 13, 2016 03:59 IST2016-05-13T03:59:19+5:302016-05-13T03:59:19+5:30

साखरपुड्याहून परतणाऱ्यांच्या मोटारीची डंपरशी समोरासमोर भीषण धडक होऊन अपघात झाला. या अपघातात चार जण ठार झाले आणि १३ जण जखमी झाले.

Four killed, 13 injured in Erandolanje accident | एरंडोलनजीक अपघातात ४ ठार, १३ जखमी

एरंडोलनजीक अपघातात ४ ठार, १३ जखमी

जळगाव : साखरपुड्याहून परतणाऱ्यांच्या मोटारीची डंपरशी समोरासमोर भीषण धडक होऊन अपघात झाला. या अपघातात चार जण ठार झाले आणि १३ जण जखमी झाले.
ही घटना एरंडोलनजीक गालापूर गावाजवळ गुरुवारी सायंकाळी घडली. यातून चार महिन्याचे बाळ सुखरुप बचावले.
मृतांमध्ये सरला निंबा भदाणे (रा. बोरकुंड ता. धुळे ह.मु. चलठाण गुजरात) या महिलेचा समावेश आहे. या अपघात मृत्यू पावलेल्या उर्वरित तिघांची नावे कळू शकली नाहीत. डंपरला वाचविण्याच्या प्रयत्नात मोटार चालकाचा ताबा सुटला आणि त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली.(प्रतिनिधी)

Web Title: Four killed, 13 injured in Erandolanje accident