जमिन खरेदीच्या नावाखाली साडेचार लाखांची फसवणूक
By Admin | Updated: July 11, 2017 22:30 IST2017-07-11T22:30:35+5:302017-07-11T22:30:35+5:30
जमिन खरेदी करुन देण्याच्या नावाखाली भिवंडीतील पडघा, तळवली येथील अमजद गोरे याने मुलुंडच्या तुषार कोटक याची साडेचार लाखांची...

जमिन खरेदीच्या नावाखाली साडेचार लाखांची फसवणूक
>आॅनलाइन लोकमत
ठाणे : जमिन खरेदी करुन देण्याच्या नावाखाली भिवंडीतील पडघा, तळवली येथील अमजद गोरे याने मुलुंडच्या तुषार कोटक याची साडेचार लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी राबोडी पोलीस फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळवलीतील गोरे याने कोटक यांना २००७ मध्ये जमीन मिळवून देतो तसेच ती जमिन अकृषीक करुन देतो, असे अमिष दाखविले होते. त्यापोटी कोटक यांच्याकडून त्याने साडे चार लाख रुपये घेतले. तसेच ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठीही दहा हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात त्याने त्यांना जमिनीचा खोटा ७/१२ उतारा बनवून दिला. कालांतराने कोटक यांनी या पैशांबाबत आणि जमिन मिळवून देण्याबाबत वारंवार विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावर त्यांनी पुन्हा पैशांची विचारणा केली असता, त्याने त्यांना ठार मारण्याचीच धमकी दिली. या सर्वच प्रकाराला कंटाळून त्यांनी अखेर याप्रकरणी १० जुलै रोजी फसवणुकीची तक्रार दाखल केली.