शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर, उस्मानाबादच्या साखर कारखान्यांकडे चारशे कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:34 IST

८२५ कोटी देणे;  साखर हंगाम बंद होऊन पाच महिने उलटले एफआरपी मिळेना

ठळक मुद्देराज्यातील कारखान्यांनी शेतकºयांचे ८२५ कोटी थकविलेसोलापूर जिल्ह्यात ३१२ कोटी ९२ लाख तर उस्मानाबाद जिल्ह्यात ८२ कोटी ३७ लाख रुपये थकबाकी काही कारखान्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली

सोलापूर : राज्यातील ७५ साखर कारखान्यांकडे एफआरपीप्रमाणे ८२५ कोटी ७५ हजार रुपये थकबाकी असून, यापैकी सोलापूरउस्मानाबाद जिल्ह्यातील कारखान्यांकडे ३९५ कोटी २८ लाख रुपये अडकले आहेत. साखर कारखाने बंद होऊन पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला तरीही शेतकºयांच्या उसाचे पैसे मात्र मिळाले नाहीत.

राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी मागील वर्षी गाळप हंगाम घेतला होता. या कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे एफआरपीनुसार २३ हजार १७३ कोटी रुपये शेतकºयांचे देणे आहेत. यापैकी २२ हजार ३६७ कोटी रुपये दिले असून १५ जुलैपर्यंत ८२६ कोटी रुपये शेतकºयांचे देणे आहे. १२० साखर कारखान्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे एफआरपी दिली असून ७५कारखान्यांकडे शेतकºयांच्या उसाचे पैसे देणे आहे. ८० टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी ५६ कारखान्यांनी दिली असून, १४ कारखान्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली आहे.  पाच कारखान्यांनी ६० टक्क्यांपर्यंत रक्कम दिली आहे. 

राज्यातील कारखान्यांनी शेतकºयांचे ८२५ कोटी थकविले आहेत त्यात सोलापूर जिल्ह्यात ३१२ कोटी ९२ लाख तर उस्मानाबाद जिल्ह्यात ८२ कोटी ३७ लाख रुपये थकबाकी आहे. हंगाम  संपल्याने कारखाने बंद होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे; मात्र शेतकºयांना उसाचे पैसे मिळत नाहीत. काही कारखान्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली असून, केंद्र व राज्य शासनाकडून येणारी रक्कम थकल्याने संपूर्ण एफआरपी देऊ शकत नसल्याचे सांगितले जाते.

साखरेला उठाव नसल्याने एफआरपी थकली आहे. शासनानेच शेतकºयांचे पैसे देण्यास सवलत दिली आहे. मागील १५ दिवसात काही रक्कम शेतकºयांना दिली आहे. एफआरपीच्या दोन टक्के रक्कम देणे आहे. ती कारखान्याकडून शेतकºयांना देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयOsmanabadउस्मानाबाद