गोंदियात अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांकडून चार दिवस सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: July 22, 2016 22:44 IST2016-07-22T22:19:40+5:302016-07-22T22:44:38+5:30

शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सतत चार दिवस सामूहिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेतील दोघांना पोलिसांनी

Four days gang rape by five innocent women in Gondia | गोंदियात अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांकडून चार दिवस सामूहिक बलात्कार

गोंदियात अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांकडून चार दिवस सामूहिक बलात्कार

फूस लावून पळविले : दोघांना अटक, तीन जण फरार

गोंदिया, दि. 22 -  शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सतत चार दिवस सामूहिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेतील दोघांना पोलिसांनी अटक केली असून तीन जण फरार झाले आहेत. शहरातील वसंतनगर भागातील पीडित मुलगी एक आठवड्यापासून आपल्या घरातून निघून गेली होती.

दि.१७ रोजी गोंदिया रेल्वे स्थानकावरून आरोपी कलीम खान रफिक खान (२२, रा.आंबाटोली), मुकेश देवीदास मेश्राम (३४, रा.रामनगर) यांनी फूस लावून तिला सूर्याटोला येथे नेले. त्यानंतर तेथून शहरातील कुंभारेनगर परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यात छोटू उर्फ प्रशांत मोटघरे (२४), लाला उर्फ मितेश रामदास ब्राम्हणकर (२३, रा.सुंदरनगर) आणि आणखी एका आरोपीचा समावेश आहे. दि.१७ ते २० असे चार दिवस तिच्यावर अत्याचार झाले. तेथून ती कशीबशी सुटून गुरूवारी (दि.२१) ती गोंदिया रेल्वे स्थानकावर आली.

मात्र घाबरलेल्या पीडित मुलीने कुठेही तक्रार दिली नाही. तिच्याकडे प्लॅटफार्म तिकीट नसल्याने रेल्वे पोलिसांनी तिला पकडले. याबाबत मुलीच्या मामाच्या मुलाला माहिती मिळाल्यानंतर तो रेल्वे पोलिसांत आला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी दुपारी २.३० वाजता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली.

याप्रकरणी भादंवि कलम ३७६ (ड, इ), ३४३, ३६६ (अ), ५०६ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी यातील कलीम खान व मुकेश मेश्राम या दोघांना अटक केली असून मितेश ब्राम्हणकर, प्रशांत मोटघरे व तिसरा आरोपी फरार आहेत.

पोलिसांची लपवाछपवी...
विशेष म्हणजे या प्रकाराची पहिली तक्रार गोंदिया रेल्वे पोलिसांकडे प्राप्त झाली. मात्र त्यांनी या प्रकरणी माहिती देण्यास टाळाटाळ केली. आम्हाला माहिती देण्याचे अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी शेवटपर्यंत माहिती दिली नाही. त्यामुळे पोलीस हे प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.

 

Web Title: Four days gang rape by five innocent women in Gondia