चार सफाई कामगारांचा नागपुरात गुदमरून मृत्यू

By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:59+5:302016-03-16T08:36:59+5:30

येथील शौचालयाच्या चेंबरमध्ये वायुगळती झाल्याने चार सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला तर अन्य एक अत्यवस्थ असून मृत्यूशी झुंज देत आहे.

Four cleaning workers die in chaos in Nagpur | चार सफाई कामगारांचा नागपुरात गुदमरून मृत्यू

चार सफाई कामगारांचा नागपुरात गुदमरून मृत्यू

हिंगणा (नागपूर) : येथील शौचालयाच्या चेंबरमध्ये वायुगळती झाल्याने चार सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला तर अन्य एक अत्यवस्थ असून मृत्यूशी झुंज देत आहे.
ही दुर्दवी घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी ग्रामपंचायतीमधील विनोबा नगरात मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. सुनील नेकराम वाल्मिकी (५०), विक्की सुनील वाल्मिकी (१८), सुमीत दिनेश चव्हाण (३०, तिन्ही रा. वैशालीनगर, डिगडोह) व बाल्या नामदेव मसादे (३५, रा. इंदिरामातानगर, डिगडोह) यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. प्रमोद हरीया चव्हाण (३५, रा. वैशालीनगर) हा अत्यवस्थ आहे. विनोबानगरातील कृष्ण विहार अपार्टमेंटच्या सेफ्टी टँकच्या चेंबर बंद झाल्याने तो दुरूस्तीसाठी सुनील, विक्की, सुमीत आणि बाल्या हे चौघेही त्यात उतरले होते. मात्र, सेफ्टी टँकमध्ये वायुगळती झाल्याने एकापाठोपाठ चौघांचाही मृत्यू झाला. त्यांचा शोध घेण्यासाठी चेंबरमध्ये शिरल्याने प्रमोद चव्हाण हा सुद्धा उतरला होता.

Web Title: Four cleaning workers die in chaos in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.