शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

चार लाचखोरांना अटक

By admin | Updated: August 22, 2014 01:31 IST

मालमत्तेच्या दस्तऐवजातील नावात बदल करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तहसील कार्यालय परिसरातील उपनिबंधक कार्यालयाच्या सहायक

लाचलुचपत विभागाची कारवाई : अमरावती व गोंदिया जिल्ह्यातील घटनाअचलपूर/गोेंदिया : मालमत्तेच्या दस्तऐवजातील नावात बदल करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तहसील कार्यालय परिसरातील उपनिबंधक कार्यालयाच्या सहायक उपनिबंधकासह स्टॅम्प वेंडर व त्याच्या सहकाऱ्याला गुरुवारी दुपारी १.३० वाजता लाचलुचपत विभागाने स्थानिक रंगेहाथ अटक केली. गोंदियया जिल्ह्यातील सालेकसा येथील एका फोटो स्टुडिओमध्ये गुरूवारी दुपारी १२ वाजता एक हजार रूपयांची मागणी करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यास अटक करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील घटनेत मनीष सुखदेवराव लाडोळे (३०, रा. बिलनपुरा, अचलपूर) असे फिर्यादीचे नाव आहे. उपनिबंधक कार्यालयाचे सहायक उपनिबंधक रमेश आनंदराव उखळकर (५४), राजेंद्र अमृतराव वानखडे (४२, रा. अब्बासपुरा, अचलपूर) व स्टॅम्प वेंडर प्रेमचंद टेकचंद दंते (४८ रा. पोस्ट आॅफीसजवळ परतवाडा) असे प्लॉट खरेदीच्या नावात फेरबदल व सब डिव्हिजन करुन देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकरल्याप्रकरणी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मनीष लाडोळे यांचे परतवाडा शहरानजीकच्या खेलतपमाळी येथे दोन प्लॉट असून ते आई व चुलत भावाच्या नावावर आहेत. सदर प्लॉटच्या दस्तऐवजातील नावात बदल आणि त्याचे सबडिव्हीजन करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. परंतु प्रक्रिया बंद झाली. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागेल, अशी कारणे सांगून आरोपींनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार लाडोळे यांनी लाचलुचपत विभागाला दिली. गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यातील पिपरिया या गावात फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे तक्रारकर्ते हे ग्रामविकास अधिकारी देवचंद लक्ष्मण मानकर (४९) याच्या सागण्यावरून सालेकसा पंचायत समितीच्या आदेशानुसार सप्टेंबर २०१२ मध्ये पिपरीयाअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) लाभार्थ्यांच्या कामाच्या नोंदवहीच्या नुतनीकरणाकरिता ४८४ लाभार्थ्यांचे फोटो काढले. त्या कामाचे १३ हजार ४९६ रूपयांचे बिल त्यांनी पिपरीया ग्राम पंचायतकडे सादर केले. ते बिल मंजून न झाल्याने सदर छायाचित्रकाराने २० दिवसांपूवी आरोपी ग्रामविकास अधिकारी मानकरकडे विचारणा केली असता त्याने त्यांना एक हजार रूपयांची मागणी केली. दुसऱ्या दिवशी बिलाच्या रकमेचा धनादेश त्यांना दिला व एक हजार रूपयांची मागणी केली. मात्र फिर्यादी तेथून निघून आले. दरम्यान ग्रामपंचायत पिपरीयाअंतर्गत नवागढ येथील अतिक्रमण काढण्याच्या एप्रिल महिन्यातील कारवाईचे व्हिडीओ शूटींगचे बील देण्यासाठी १९ आॅगस्ट रोजी तक्रारकर्ते ग्राम पंचायत कार्यालयात गेले असता आरोपी मानकरने त्यांना १३ हजार ४९६ रूपयांचे बील काढून दिले त्याचे एक हजार रुपये आधी दिल्यानंतरच पुढील बिल काढून देणार, असे सांगितले. यावर सदर छायाचित्रकाराने २० आॅगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. त्या तक्रारीच्या आधारे विभागाच्या पथकाने २१ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजतादरम्यान सालेकसा येथील ए.टी.एस. फोटो स्टुडिओमध्ये सापळा लावला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, सहायक फौजदार दिवाकर भदाडे, हवालदार गोपाल गिऱ्हेपुंजे, दीपक दत्ता, राजेश शेंद्रे, तोषंत मोरे, योगेश उईके, देवानंद मारबते व महिला पोलीस शिपाई तनुजा मेश्राम यांनी यशस्वी केली. (तालुका प्रतिनिधी)