चार आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर

By Admin | Updated: July 23, 2016 04:46 IST2016-07-23T04:46:17+5:302016-07-23T04:46:17+5:30

ऐतिहासिक आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या चौघांची सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिनावर सुटका केली

Four accused arrested for anticipatory bail | चार आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर

चार आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर


मुंबई : ऐतिहासिक आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या चौघांची सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिनावर सुटका केली. मात्र या चौघांनाही आंबेडकर भवनच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे नागसेन सोनारे, उमाकांत गवारे, अभय बनबोले आणि उत्तमराव बोधवडे या चौघांचे नाव एफआयआरमध्ये नोंदवण्यात आले आहे. माजी आयएएस अधिकारी रत्नाकर गायकवाड व अन्य काही जणांवरही यासंदर्भात आरोप ठेवण्यात आले आहेत. आनंदराज आंबेडकर यांनी यासंबंधी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर या चौघांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, राज्य सरकारने बुधवारी शासकीय निधीतून आंबडेकर भवनची पुनर्बांधणी करण्याचे आश्वासन दिले. त्यावर डॉ. आंबेडकरांचे कुटुंबीय आणि पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट (पीआयटी) सहमत झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Four accused arrested for anticipatory bail