शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

‘प्रोबेस’चा ढिगारा उपसला

By admin | Updated: May 30, 2016 04:16 IST

मिथेनॉलसह अल्कोहोलने भरलेले १५ बॅरल तळोजा येथे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने वायुगळती होण्याचा धोका टळला.

डोंबिवली : प्रोबेस कंपनीतील रिअ‍ॅक्टर स्फोटानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली असलेले मिथेनॉलसह अल्कोहोलने भरलेले १५ बॅरल तळोजा येथे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने वायुगळती होण्याचा धोका टळला. येथील मातीचे ढिगारे उपसण्याचे काम रविवारी संपल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले.रविवारी पहाटेपर्यंत घटनास्थळावरील पोकलेन, जेसीबीसह सर्व साधनसामग्री-अधिकारी, कर्मचारी परतले. त्यामुळे आता केवळ निवडक पोलीस, अग्निशमन दलाचे पथक तैनात केलेले आहे. स्फोटात जखमी झाल्याने खाजगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झाली असून गेले दोन-तीन दिवस अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना सर्वसाधारण वॉर्डात हलवले आहे. त्यामुळे आता कुणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी स्मिता रोडे यांनी दिली.प्रोबेस कंपनीशेजारील केमिकल कंपन्यावगळता अन्य कंपन्यांचे कामकाज रविवारपासून सुरू झाले. ज्या कंपन्यांचे खूप नुकसान झाले आहे, तेथील कामगार तुटलेले पत्रे, खुर्च्या, टेबल, पंखे, संगणक, फ्रीज हे सामान गोळा करीत होते. आणखी तीन-चार दिवस हे काम सुरू राहणार आहे.कंपन्यांमधील कामगारांखेरीज अन्य कोणालाही त्या ठिकाणी प्रवेश देण्यात येत नव्हता. कुतूहलापोटी येणाऱ्यांना पोलीस मज्जाव करीत होते. पंचनामा करण्यासाठी नेमलेल्या चार-पाच पथकांनी तीन दिवसांनी सुटी घेतल्याने रविवारी पंचनामा कक्षात माहिती संकलनाचे काम सुरू होते. दुपारी साडेतीनपर्यंत ११ जणांचा पंचनामा केला गेला. घटनेपासून तीन दिवस घर बंद ठेवून ते बाहेर गेले होते. आवश्यकता असल्यास सोमवार-मंगळवारी आणखी काही पंचनामे करू, असे कक्षाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी गेले तीन दिवस ५०० मीटर परिसरातील रहिवाशांना घरे सोडून जाण्यास सांगितले होते. रविवारी प्रथमच ते दिवसभर घरी होते. दिवसभर घराची आवराआवर केली. स्फोटाने उद्ध्वस्त झालेले संसार पाहून अनेक गृहिणींच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.>चोरीच्या चर्चेला उधाणस्फोटानंतर भयभीत रहिवासी घराबाहेर पडले, तेव्हा किमान १५ ते २० घरांतील मुद्देमाल चोरीस गेल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. काही वाहिन्यांवरही तशी वृत्ते झळकली. मात्र, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांनी त्यास दुजोरा दिला नाही.घटनास्थळी असलेली रसायने हलवल्यामुळे धोका पूर्णपणे टळला आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून अग्निशमन दल व महापालिकेचे पथक तैनात केले आहे. मात्र, नागरिकांनी सतर्क राहावे व काही शंका असल्यास मदत कक्षाशी संपर्क साधावा. - प्रसाद उकर्डे, प्रांताधिकारी