मृत अर्भक सापडले

By Admin | Updated: January 7, 2017 02:14 IST2017-01-07T02:14:23+5:302017-01-07T02:14:23+5:30

साकीनाका पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

Found dead baby | मृत अर्भक सापडले

मृत अर्भक सापडले


मुंबई : साकीनाका परिसरात शुक्रवारी अर्भकाचा (मुलगा) मृतदेह आढळला असून, या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. येथील हनुमंता घास कंपाउंडमध्ये असलेल्या मुस्लीम सोसायटी परिसरात मिठी नदीच्या जवळ मृत अवस्थेतील एक अर्भक स्थानिकांना निदर्शनास आले. याची माहिती स्थानिक अक्रम कुरेशी यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या साकीनाका पोलिसांनी हे अर्भक राजावाडी रुग्णालयात पाठविले. डॉक्टरांनी हे अर्भक मृत असल्याची माहिती दिली असून या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली, असे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

Web Title: Found dead baby