“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:37 IST2025-07-16T17:33:02+5:302025-07-16T17:37:42+5:30

Shiv Sena Shinde Group Hemant Godse News: हेमंत गोडसे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

former mp hemant godse said bjp has good organization but shiv sena shinde group lacks internal discipline | “भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले

“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले

Shiv Sena Shinde Group Hemant Godse News: मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. मी त्यांच्यावर नाराज नाही. पण पक्षांतर्गत शिस्त नाही, मी याबाबत मांडणी केली आहे. मी जे सांगितले त्यावर चर्चा होत नाही. पद वाटप, संघटन, नियुक्त्या आणि योग्य सिस्टम नाही. एकनाथ शिंदे काम करत आहेत, पण जिल्ह्यातील मंत्र्यांनी त्या संघटनेत लक्ष घालायला पाहिजे. तर संघटना मजबूत होईल, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

पत्रकारांशी बोलताना हेमंत गोडसे म्हणाले की, आपल्याकडे एकच आमदार येतात. संघटन मजबूत झाले, बांधणी चांगली झाली तर फरक पडेल. संघटनेला ताकद द्यायला पाहिजे. एकटे एकनाथ शिंदे काम करू शकत नाही. त्यांचा भार कमी केला पाहिजे. गुणवत्तेवर पदाधिकारी नेमले पाहिजे. एखाद्या पक्षात शिस्त असली की, गटबाजी होत नाही. चर्चा चव्हाट्यावर जायला नको, असे हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे. 

भाजपामध्ये संघटन चांगले आहेत, तसे व्हायला हवे

भाजपामध्ये जाण्याचा कोणताही विचार केलेला नाही. भाजपमध्ये संघटन चांगले आहेत. तसे आपल्या पक्षात व्हायला पाहिजे असे मी सांगितले होते. वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे. सामाजिक काम घेऊन श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना एकनाथ शिंदे न्याय देतील. गोष्ट कुटुंबाच्या बाहेर जायला नको आणि तेच होत आहे, अशी अपेक्षा हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. काही विषय जिल्हा पातळीचे असतात. लहान विषयांसाठी राज्य पातळीवर जाण्याची गरज भासायला नको.  माझ्या तिकिटासाठी उशीर झाला, त्याला समन्वय नाही, तर अनेक कारणे आहेत. नेते, उपनेते, सर्वांना सांगितले आहेत, असेही हेमंत गोडसे यांनी नमूद केले.

 

Web Title: former mp hemant godse said bjp has good organization but shiv sena shinde group lacks internal discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.