काेराेनाग्रस्तांसाठी राज्यातील माजी आमदार देणार एक महिन्याचे मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 07:44 PM2021-05-04T19:44:36+5:302021-05-04T19:49:32+5:30

Former MLAs in the state will pay one month's honorarium for the corona victims : काेराेनाग्रस्त रुग्णांच्या उपचारार्थ तसेच इतर बाबींकरिता मदत म्हणून हे मानधन देत असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे़. 

Former MLAs in the state will pay one month's honorarium for the victims | काेराेनाग्रस्तांसाठी राज्यातील माजी आमदार देणार एक महिन्याचे मानधन

काेराेनाग्रस्तांसाठी राज्यातील माजी आमदार देणार एक महिन्याचे मानधन

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य माजी आमदार समन्वय समितीचा निर्णयपत्र ३ मे राेजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे़.

अकाेला : देशासह राज्यातील काेराेनाचे संकट गडद हाेत असताना काेराेना प्रतिबंधाच्या लढ्यासाठी राज्यातील माजी आमदार त्यांचे एक महिन्याचे मानधन राज्य सरकारला देणार आहेत़. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य माजी आमदार समन्वय समितीने घेतला असून, तसे पत्रच ३ मे राेजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे़. काेराेना संकटाचा मुकाबला करण्यासाठी खारीचा वाटा उचलत राज्यातील माजी आमदारांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन देण्याचे ठरविले आहे़. राज्यात अंदाजे १५०० आमदार असून, त्यांना दरमहा मिळत असलेल्या मानधनातून त्यांचे एक महिन्याचे मानधन कपात करून राज्यातील काेराेनाग्रस्त रुग्णांच्या उपचारार्थ तसेच इतर बाबींकरिता मदत म्हणून हे मानधन देत असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे़. पत्राच्या प्रतिलिपी उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांना पाठविल्या आहेत़.

 

काेराेना संकटाच्या काळात मदतीचा हात म्हणून राज्यातील माजी आमदारांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्यातील १५०० आमदारांच्या मानधनातून एक महिन्याचे मानधन कपात करण्याबाबतचे पत्रही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे़ राज्यातील काेराेनाग्रस्त रुग्णांच्या उपचारार्थ तसेच इतर बाबींकरीता मदत म्हणून हे मानधन देत आहाेत़

-सुधाकर गणगणे, माजी मंत्री

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माजी आमदार समन्वय समिती

Web Title: Former MLAs in the state will pay one month's honorarium for the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.